एनल फिस्टुला हा एक अत्यंत किचकट आणि असहनीय आजार आहे. शब्दशः अवघड जागेचं दुखणं! सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. शौचाची जागा सोडून आजूबाजूला आणखी एक लहानसे गुदव्दार तयार होते त्याचे आतील रंग आतड्याच्या शेवटच्या भागात उघडते.
कारणे-
1. अनुवंशिक- अनुवंशिकतेने एका पिढीतून दुसर्या पिढीत हा आजर येऊ शकतो.
2. जन्मजात- काही नवजात अर्भकांना सुध्दा जन्मजात फिस्ट्युला असतो.
3. बैठ्या कामामुळे, दगदगीमुळे, अंगात उष्णता वाढल्यामुळे विशेषतः फिरतीवर असणार्या व्यक्तिंना म्हणजे सेल्समन, रिप्रेझेंटेटिव्हज्, शिफ्टमधे काम करणार्या व्यक्ती ज्यांचे खाण्याचे, विश्रांतीचे वेळापत्रकच नसते अशा व्यक्तींना हा आजार होण्याचे जास्त प्रमाण असते.
लक्षणे- फिस्ट्युला हा गुदव्दाराआतील ग्रंथींमधून सुरू होतो. यातून एक प्रकारचा चिकट स्राव येत रहातो. फिस्ट्युला मोठा होत गेला तर या नलिकेचा व्यास जास्त होऊन कधी कधी मळ सुध्दा यातून बाहेर पडतो. हा आजार व्यक्तीला हे खूप त्रासाचे व अस्वस्थतेचे ठरते. सतत खराब वास येत राहातो. क्वचित इन्फेक्शन होण्याने पू आणि रक्त सुध्दा फिस्ट्युलामधून येत रहाते. ही जागा दुखत रहाते. अवघड जागेत असल्यामुळे व सारखा स्राव येत राहिल्यास स्वच्छता ठेवता येत नाही. त्यामुळे सततचे इन्फेक्शन होणे साहजिक असते.
उपचार- रूढ उपचारांमधे शस्त्रक्रिया हाच एक उपचार असतो. कारण फक्त पू- रक्त येणे थांबवण्यासाठी प्रतिजैविके (अँटीबायोटिक्स) देता येतात पण पूर्ण फिस्ट्युला मार्ग मात्र इंग्लिश औषधांनी कमी करता येत नाही. तसे संपूर्ण रचनात्मक उपचार करण्याचे सामर्थ्य मात्र फक्त एकाच उपचार शास्त्रात आहे ते म्हणजे होमिओपॅथी.
होमिओपॅथी- होमिओपॅथीमधे फिस्ट्युला ट्रॅक्टरच्या आतील बाजूने जो त्वचेसारखा अंतस्थ पेशींखा थर असतो तो नष्ट करून एकसंघ एकसारखा भाग करण्याचे सामर्थ्य असते. उपचारकाल हा एक वर्ष ते साधारण 18 महिन्यापर्यंत असतो.
औषधे-
1. ऑरम मेट
2. काँडुरँगो
3. सिफीलीनम
4. नॅट्रीक अॅसीड इत्यादी
इतर- पचनक्रिया व्यवस्थित राखणे व शरिरातील जैविक घड्याळाचा तोल सांभाळणे हे सर्वात महत्वाचे आहे. त्याकरिता पोट साफ होणे सर्वात आवश्यक आहे. त्याकरिता वेळेवर जेवणे, आहारात तेलाचे प्रमाण अल्प असून तंतूमय पदार्थ उदा. मेथीदाणे, गव्हचा कोंडा, फळफळावळ, काकडी, गाजर, कोबी, बीटरूट इत्यादींचा समावेश असणे अत्यावश्यक आहे. पाणी भरपूर पीणे प्रशस्त असते.
संपर्क
डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक – ९९१६१०६८९६
सरनोबत क्लिनिक- ९९६४९४६९१८
Very informative medical informatin to common people