शहरातील प्रत्येक गल्लीत,उपनगरात मराठी अस्मितेच स्फुल्लिंग कायम चेतत असतं मात्र आकाराने लहान बाजार पेठेत सर्वत्र इलेक्ट्रॉनिक दुकानासाठी प्रसिद्ध असणाऱ्या बापट गल्ली आणि येथील कालिकादेवी युवक मंडळ नेहमीच आक्रमक मराठी अस्मिता जपणारी एक कणखर गल्ली म्हणून पुढे आली आहे.
सीमालढ्याचे केंद्र येळ्ळूर गाव आहे .येळ्ळूर मध्ये जे पिकतय ते सीमा भागात उगवतय त्याच धर्तीवर शहरात बापट गल्लीत मराठी अस्मितेची लाट तयार होणारं केंद्र म्हणून समोर येत आहे.एकीसाठी पाईकांना पाठिंबा असोत किंवा उत्तर मध्ये समितीचाच जय जयकार करणे असो नूतन मराठी भाषिक महापौर आमदार निवड झाल्यास सर्वात आधी सत्कार करण्यास कालिकादेवी युवक मंडळाचा पुढाकार असतो.
शहराचं नाव बेळगावी अस केंद्र सरकारच्या गृह मंत्र्याने जाहीर केल्यावर सर्वप्रथम या गल्लीच्या विरोध केला. याच काळात गणपती उत्सवात मारवाडी समाजाने ५0 हजार गणेश भक्तांना अल्पोपहार देण्याचे आयोजन केले होते ,त्यावेळी राजस्थानी समाजाने महा प्रसादाच्या फलकांवर बेळगावी उल्लेख केला म्हणून अल्पोपहार नाकारला होता, कालिका देवी मंडळाची भूमिका पूर्ण बेळगाव शहराने स्वीकारली होती केवळ बापट गल्लीच्या मराठी बाण्या पुढे राजस्थानी लोकांनी फलकावर बेळगावी ऐवजी बेळगाव अस प्रिंट करून नवीन फलक लावल्यावरच सर्व शहराने अल्पोपहार घेतला होता असे अस्मिते साठी काम करणारी गल्ली म्हणून बापट गल्ली सर्वांना परिचित आहे.’मी मराठी’ लिहिलेलं कार्तिक लावणे आणि प्रत्येक घरावर मराठी नाम फलकांची पट्टी बसवणे अश्या मोहिमा बापट गल्लीतूनच सुरू झाल्या होत्या.
गुरुवारी झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत उपमहापौरपदी निवड झालेल्या मधुश्री पुजारी यांचा सत्कार देखील कालिकादेवी युवक मंडळाने केलाय.सुनिल केसरकर, सुनिल मुरकूटे, अंकुश केसरकर, भाऊ किल्लेकर,अमोल केसरकर, महेश पावले आदींनी सहभाग घेतला होता.मागील वर्षी संज्योत बांदेकर यांचा देखील सर्वात आधी सत्कार याचं मंडळांने केला होता.मराठी अस्मितेची साद सर्व बेळगाव शहर आणि सीमा भागाला देणाऱ्या कालिकादेवी युवक मंडळाच्या कार्यास बेळगाव live च्या शुभेच्छा…