होळीच्या दिनी शहर परिसरात झालेल्या दोन अपघातात एक ठार तर तिघे जण जखमी झाले आहेत. हलगा पुणे बंगळूरू हायवे जवळील सर्विस रस्त्यावर दोन दुचाकींची आमोरा समोर टक्कर झाल्याने झालेल्या अपघातात एक युवक ठार तर दोघे जण जखमी झाल्याची घटना सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली आहे तर अन्य खानापूर रोड झालेल्या अपघातात एक युवक जखमी झाला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार बाबू मल्लाप्पा कोळीकोपप वय २२ रा.तारीहाळ असे मयत युवकाचे नाव आहे. तर विशाल बडसकर वय १८ रा. तारीहाळ, आणि मंजुनाथ मरकल वय ३४ रा हलगा हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
बाबू हा आपल्या मित्र विशाल सह बेळगावहून तारीहाळ कडे जात होता तर मंजुनाथ मरकल हा हलाग्याहून बेळगावकडे जात होता दोन्ही दुचाकीत आमोरा समोर टक्कर होऊन हा अपघात घडला आहे. अपघात होताच जखमी अवस्थेत तिन्ही युवकांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले मात्र त्यात उपचार सुरु असताना बाबूचा मृत्यु झाला तर अन्य दोघे जण गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी बागेवाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
खानापूर रोड वर दुचाकी डिवाईडरला आदळली
खानापूर रोड वर फिश मार्केट जवळ एका दुचाकी स्वार युवकाने डीवाईडर ला जोराची धडक दिल्याने सदर युवक जखमी झाला त्याचे किरण भरमाना मिसाळे वय १८ रा संतीबस्तवाड असे नाव असून या अपघातात दुचाकीचे भरपूर नुकसान झाले आहे. होळीच्या निमित्ताने दारूच्या नशेत अति वेगाने गाडी चालवत होता वेगावर नियंत्रण न राहिल्याने दुचाकीने डिवाईडरला ठोकर दिली त्यात किरण जखमी झाला आहे. दक्षिण रहदारी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.