नाटक आणि नाट्य चळवळीशी अजिबात संबंध नसलेल्या मतलबी मंडळींनी उमेदवार लादण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. खरेतर निवडणुकीची गरजच नव्हती आणि समांजस्याने सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक होते, पण नकोत्या उमेदवारांना उभे करून नाटक सुरू आहे. मी नाट्यसेवक असून मला अखिल भारतीय नाट्य परिषदेवर निवडून द्यावे असे आवाहन या निवडणुकीतले उमेदवार राजू सुतार यांनी केले.
रविवार दि ४ रोजी कोरे गल्ली येथील सरस्वती वाचनालय येथे सकाळी ९.३० ते ५.३० यावेळेत ही निवडणूक होणार आहे. तीन उमेदवारात रस्सीखेच लावून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न काही विघ्नसंतोषी लोक करीत आहेत, मात्र नाट्य सेवक या नात्याने आपल्याला जास्तीत जास्त मते घालून निवडून ध्यावे असे आवाहन राजू यांनी केले आहे.
मागील १३ वर्षे नाट्य परिषदेचा सदस्य म्हणून आपण कार्यरत आहे.बेळगाव येथे झालेल्या नाट्य सम्मेलनाच्या आयोजनात आपला सहभाग आहे. बेळगाव शाखेचा उपाध्यक्ष आणि अध्यक्षांच्या अनुपस्थितीत अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. असे असताना आपल्याला पाठींबा देण्याऐवजी आगंतुक मंडळींना उभे करून राजकारण करण्यात येत असून आपणच या निवडणुकीत योग्य उमेदवार आहे असा दावा त्यांनी केला आहे.