आजचा होळीचा दुसरा दिवस. बेळगाव शहरात आज रंगपंचमी साजरी केली जाते. सकाळपासूनच रंगाच्या या सणाला उत्साही वातावरणात साजरा करण्यासाठी तयारी सुरू आहे. सारे बेळगाव रंगून जाण्यासाठी सज्ज झाले आहे.
शहराच्या विविध भागात तरुण आणि लहान मुले रंग खेळण्यासाठी बाहेर पडत आहेत. सकाळी ९ पर्यंत रंगाचा सण सुरू झाला आहे.
बेळगावच्या पांगुळ गल्लीत अश्वत्थामा मंदिरात लोटांगण घालण्याची धार्मिक परंपरा आहे. ही परंपरा राखण्यासाठी पांगुळ गल्लीत सर्व तयारी झाली आहे. याचबरोबरीने टिळकवाडी आणि उपनगरी भागातही रंगाच्या सणाचा उत्साह दिसू लागला आहे.
कोणत्याही प्रकारे चुकीचे न वागता हा सण साजरा करावा आणि कोणी चुकीचे वागत असल्यास त्यांच्याशी वाद न घालता त्यांना पोलीस वर्गाच्या हाती द्यावे. हेच बेळगाव live तर्फे आवाहन.