भाषा संस्कृती आणि विस्तारासाठी या सगळया गोष्टीचं व्यासपीठ म्हणून तरुण भारत कडे बघितलं जातंय असे गौरव उदगार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.शनिवारी सकाळी दैनिक तरुण भारत भेट दिल्यावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी तरुण भारतचे सल्लागार संपादक किरण ठाकूर मध्यवर्ती समिती अध्यक्ष दीपक दळवी, आमदार अरविंद पाटील,खासदार प्रभाकर कोरे, आदी उपस्थित होते.
बाबुराव ठाकूर यांनी या भागातील शेतकरी आणि अन्य घटकांचे वृत्तपत्र व्यासपीठ म्हणून कार्य केले होते.मराठी साठी काम करणाऱ्या वृत्तपत्रात तरुण भारतचं नाव अग्र क्रमाने घ्यावं लागेल. वृत्त पत्र व्यवसायिक म्हणूंन चालतात तरुण भारत हे या भागातील प्रश्नांचे तयार केलेलं व्यासपीठ आहे
तरुण भारत या भागात सध्या अग्रेसर असून याचा वाचक वर्ग देखील वाढला आहे असेही ते म्हणाले. यावेळी विविध संस्थांच्या वतीनं पवार यांचा सत्कार करण्यात आला.न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणून यशवंत राव चव्हाण होत असेही ते म्हणाले.