तुकाराम बँक एकेकाळी मरण अवस्थेत होती एन पी ए एकदम खाली घसरला होता अश्या दुसऱ्या बँका डब घाईला गेलेत मात्र प्रकाश मरगाळे यांनी या बँकेला उर्जितावस्था प्राप्त करून दिली आहे असे मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं.
शनिवारी एकीकरण समितीच्या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी ते बेळगाव दौऱ्यावर आले आहेत.सकाळी तुकाराम बँकेला सदिच्छा भेट दिली .यावेळी आयोजित कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक, उपमहापौर मधूश्री पुजारी, तुकाराम बँकेचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, दिपक दळवी,मनोहर किणेकर,आमदार अरविंद पाटील उपस्थित होते.यावेळी पवारांचा तुकाराम बँक आणि विविध संघ संस्थांच्या वतींन सत्कार करण्यात आला.
चांगल्या हेतूने या बँकेचं कार्य सुरू असून महाराष्ट्र कर्नाटक गुजरात मधील नागरी बँका कडून चांगलं कार्य होत आहे गरीब लोकांना अश्या बँकातून मदत झाली पाहिजे अश्याच बँकातून कर्जे घेऊन लोकांनी कर्जे घेऊन उद्योग धंदे करावे वेळेत कर्ज भरावी आणी समाजाचा उत्कर्ष करावा अस देखील ते म्हणाले.