Tuesday, June 25, 2024

/

वर्धापन दिनात सहभागी संपादकांवर गुन्हे

 belgaum

बेळगाव लाईव्ह चा प्रथम वर्धापन कार्यक्रम यशस्वी झाल्याने पोटशूळ उठलेल्या प्रशासनाने live वर गुन्हा नोंद केला आहे.टिळकवाडी पोलिसांनी निवडणूक आचार संहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवत दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत,तरुण भारतचे सल्लागार संपादक किरण ठाकूर,बेळगाव live चे संपादक प्रकाश बेळगोजी यांच्या सह रामनाथ मंगल कार्यालयाचे मालक एस आर नाईक यांच्या वर गुन्हा दाखल केला आहे.

SAnjay rautटिळकवाडी पोलिसांनी दोन भाषिकांत तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत आय पी सी 153 अ,505(2)125,171(फ) अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. बेळगाव live ने वेब पोर्टल चा पहिला वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमात अनेक सेवा भावी नागरिकांचा,खेळाडू,पोलीस,समाज सेवक,पर्यावरण वादी यांचा सत्कार आयोजित केला होता आमंत्रित केलेले सर्व नेते कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी झाला बेळगाव live ला अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला त्यामुळं पोटशूळ उठून ही कारवाई झाली आहे.या कारवाई वरून प्रसार माध्यमांची गळचेपी होत आहे लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ सुरक्षित आहे का?असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.