दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या नऊ जणांच्या आंतरराज्य टोळीला अटक केली. मध्यरात्री एकच्या सुमारास बागेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली. हे सर्वजण कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील शिर्डी, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील आहेत.
या टोळीने 26 रोजी कोप्पळ जिल्ह्यातील गीनिगेरा येथे तर 28 रोजी होन्नावर तालुक्यातील कर्की येथे दरोडा टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडून तीक्ष्ण हत्यारे, चटणीची पूड व अन्य काही लोखंडी साहित्य सोबत घेऊन ही टोळी दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात होती. याची माहिती पोलीस निरीक्षक एस सी पाटील यांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसह येथे जाऊन व्यवस्थित सापळा रचला. यामुळे सर्व संशयित त्यांच्या जाळ्यात अडकले.
या टोळीकडून 7 मोबाईल, काही सोन्याचे दागिने चाकू, कोयते, लोखंडी रॉड व काही रोख रक्कम जप्त केली आहे. दरोड्यासाठी वापरण्यात आलेले क्रुझर वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाहतूक व गुन्हे विभागाचे डीसीपी महानिंग नांदगावी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या सर्वांना न्यायालयासमोर उभे