Friday, November 15, 2024

/

शिवसेना सीमाभागात समितीच्या पाठीशी: संजय राऊत

 belgaum

बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट करणे हे शिवसेनेचे ध्येय आहे. यासाठीच संपूर्ण कर्नाटकात शिवसेना विधानसभा निवडणूक लढवेल पण सीमाभागात शिवसेना एकही उमेदवार देणार नाही. हीच भूमिका भाजप व काँग्रेस च्या महाराष्ट्रातील नेत्यांनी दाखवून द्यावी. समिती उमेदवाराच्या प्रचारासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी बेळगावला यावे. हे उदगार काढले आहेत सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी.SAnjay raut
बेळगावकरांचे लाडके मराठी वेबपोर्टल बेळगाव live च्या पहिल्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते.
गुरुवारी सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम रामनाथ मंगल कार्यालय येथे साजरा झाला. हा प्रश्न सुटेतोवर हा भाग केंद्रशासित करावा या मागणीचा उच्चार करून त्यांनी आज संपूर्ण महाराष्ट्राने भीमटोला देण्याची वेळ आली आहे. असेही सांगितले आहे.
या सोहळ्याला मॅक्स महाराष्ट्र चे संपादक रवींद्र आंबेकर , तरुण भारतचे समूह प्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकूर, उप महापौर मधूश्री पुजारी तसेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सीमाप्रश्नाच्या लढाईत शिवसेनेने मुंबईच्या रस्त्यावर ६५ हुतात्म्यांचे रक्त सांडले आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत, आता वेळ आली आहे निवडणुकीने लोकेच्छा दाखवण्याची, यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही समितीच्या प्रचारासाठी घेऊन येण्याची तयारी सुरू आहे. सीमाप्रश्नाच्या पाठीशी राहणाऱ्या महाराष्ट्रातील भाजप व काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांनीही असे करण्याची वेळ आली. सीमाभागात राष्ट्रीय पक्षांच्या कोणत्याही उमेदवाराने निवडणूक लढवू नये ही काळाची गरज आहे. असे ते म्हणाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.