बेळगाव live चा पहिला वर्धापन दिन कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आहे, ते सेवाभावी बेळगाव पुरस्कार वितरणाचे. कोण ठरणार या स्पर्धेतील ओपिनियन पोल चा विजेता? कुणाला मिळणार हा मान? याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
गुरुवार दि २९ रोजी सायंकाळी ५ वाजता रामनाथ मंगल कार्यालयात आयोजित भव्य समारंभात हा मानाचा पुरस्कार दिला जाणार आहे. साहजिकच सामाजिक सेवा, उल्लेखनीय पोलीस अधिकारी, लढाऊ आणि समर्थ साथ देणारे व्यक्ती, उल्लेखनीय खेळाडू व पर्यावरण मित्र अशा ५ वेगवेगळ्या गटातील ५ व्यक्तींना हा मानाचा पुरस्कार देऊन ” बेळगाव live” तर्फे सन्मानित केले जाणार आहे.
२०१७ च्या २७ फेब्रुवारीला “बेळगाव live” या प्रत्येकाचा बुलंद आवाज आणि हक्काचे व्यासपीठ असलेल्या न्युज पोर्टल चा जन्म झाला. अवघ्या वर्षभरात हे पोर्टल सुप्रसिद्ध बनले. बेळगावातील जनताच नव्हे तर देश आणि विदेशात पसरलेले बेळगावकर तसेच बेळगाववर लक्ष असणाऱ्या आणि प्रेम करणाऱ्या प्रत्येकानेच ” बेळगाव live” वर भरभरून प्रेम केले. पोर्टलचे फेसबुक पेज ३० हजार फॉलोवर्स च्या उंबरठ्यावर आहे आणि प्रत्येक बातमीला १० ते १५ हजार हिट्स हे अल्पकाळात मिळवलेले यशच म्हणता येईल.
” बेळगाव live” चा पहिला वर्धापन दिन सोहळा २९ मार्चला थाटात साजरा होत आहे. या निमित्ताने हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी बेळगाव live ने ओपिनियन पोल च्या माध्यमातून जनतेच्या मनातील जागा व्यापलेल्या व्यक्तींना सन्मानित करण्याचे ठरवले आहे.
या वेगवेगळ्या क्षेत्रातील नावे म्हणजेच पर्याय आम्ही घोषित केले. घोशीत नावापैकी प्रत्येकजण ग्रेट आहेच पण त्यापैकी पाच जणांना मते देऊन निवडले आहे तुम्ही म्हणजेच मायबाप जनतेने.
तर मग उत्सुकता ताणून ठेवा आणि या वर्धापन दिनाला तेथेच कळतील कोण आहेत पुरस्कार प्राप्त सेवाभावी बेळगावकर…….