belgaum

महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार  कै बळवंतराव सायनाक हे देवमाणूस होते. त्यांना आम्ही बेळगावचे जुने लोक पाठींबा देत होतो कारण माणुसकी जपून ते काम करत होते. बेळगाव मुस्लिम फोरमच्या सदस्यांनी ही माहिती जाहीरपणे दिली आहे. Cks nazeer
बेळगाव मुस्लिम फोरम च्या सदस्यांनी आमदार फिरोज सेठ यांच्या कार्य पद्धतीवर नाराजी व्यक्त करण्यासाठी तिकीट देऊ नका अशी मागणी करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते त्यावेळी वफ बोर्डाचे माजी अध्यक्ष सी के एस नजीर यांनी सायनाक यांच्या कार्याचे जाहीर रित्या कौतुक केलं.
सायनाक यांच्या सारखे  नेते आज मिळणे अवघड आहे. सायनाक यांनी समितीचे आणि मराठी माणसाचे प्रतिनिधित्व केले तरी मुस्लिमांना कधीच वाऱ्यावर सोडले नाही त्यांना आम्ही नमन करतोअसे म्हणून भावनिक झाले. आज त्यांच्या सारख्या नेत्याची समाजाला बेळगावला गरज आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्र एकीकरण समिती कुठल्या जातीधर्माच्या विरोधात नाही तर बेळगावात केवळ मराठी भाषा टिकवण्यासाठी काम करते  याची देखील चर्चा त्या ठिकाणी ऐकायला मिळाली.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.