बेळगाव शहराचे वातावरण आणि शांतता बिघडवण्यात फिरोज सेठ यांचा हात मोठा आहे, त्यांनीच वारंवार दंगली माजवल्या असून आशा माणसाला राजकारणातून नेस्तनाबूत करण्यासाठी मुस्लिम फोरम ची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
आम्ही शांतता निर्माण करतो. हिंदू मुस्लिम शीख इसाई सारे भाई भाई आहोत. पण राजकीय फायद्यासाठी सेठ याला सुरुंग लावत आहेत.
काँग्रेस पक्षाच्या निरीक्षकांनाही खिश्यात ठेवलेत, त्यांना फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये ठेऊन आपले वर्चस्व गाजवण्याची कामे सुरू आहेत. आपल्याच लोकांना वडे देऊन वर्चस्वावाद सुरू आहे, तो आम्ही मोडून काढणारच असेही सांगितले आहे.
बेळगाव काँग्रेस पक्ष हा एका घरा पुरता मर्यादित असलेला पक्ष बनला असल्याचा आरोप के पी सी सी सदस्य बाबूलाल बागवान यांनी केला.दोनवेळा निवडून आल्यावर जस रमेश कुडचो यांच तिकीट कापण्यात आलं तसंच सेठ यांना नारळ द्यावा अशी मागणी हाय कमांड कडे केली आहे रमेश जारकीहोळी सतीश जारकीहोळी यांना कल्पना दिली असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.
सध्या मुस्लिम समाजात फतवा काढला जात नाही शेवटच्या रात्री फतवा देऊन सेठ यांना मतदान करा असे सांगितले जात नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.