चन्नम्मा सर्कल मध्ये गुरुवारी सकाळी अचानक ओमनी मोटार व्हॅन पेट घेतला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु मोटार जळून खाक झाली. कोल्हापूर येथील परशुराम जयवंत कागलकर हे त्यांच्या नातेवाईकांना घेऊन बेळगावला एका नातेवाईक रुग्णाला पाहण्यासाठी आले होते.
चन्नम्मा सर्कल मध्ये अचानक मोटार बंद पडली . त्यांनी ती सुरू केली परंतु पुढे 50 मीटरवर असलेल्या बस थांब्याजवळ पुन्हा मोटार बंद पडली. त्यांनी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला असता पाठीमागील बाजूने अचानक धूर येऊ लागला व लागलीच मोटारीने पेट घेतल.
यावेळी मोटारीत असलेले चालकासह सहाजण तातडीने उतरून बाजूला झाले. त्यानंतर आग चांगलीच भडकली. अग्निशामक दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली. चन्नम्मा सर्कल मध्ये घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. वाहतूक कोंडी झाल्याने येथे सुरू असलेले सिग्नल बंद करून पोलीस स्वतः वाहतुकीला शिस्त लावत होते. मोटारीचे मोठे नुकसान झाले आहे खडेबाजार व वाहतूक पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते