ग्लोब कडून बी एस एन एल कडे वळताना दुचाकीने दुचाकीला दिलेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक किरकोळ जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी नऊ च्या सुमारास घडली आहे. लियानो इमायूल वय 24 वर्ष रा.बंगळुरू हा ऑटोमोबाईल अभियंता ठार तर राकेश राजेंद्र वय 24 रा.नंजनगुड मैसूरू जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघे अभियंते अलमा मोटर्स देसुर येथे ट्रेनिंग साठी आले होते बुधवारी सकाळी ते दुचाकी वरून देसुर हुन बेळगाव ला येत होते तर फिश मार्केट कडून गोगटे सर्कल कडे वेगाने येणाऱ्या दुचाकी बी एस एन एल कडे वळसा घेणाऱ्या दुचाकीला ठोकर दिली त्यावेळी ग्लोब समोर हा अपघात घडला आहे.मयत लियानो हा मागे बसला होता तर राकेश गाडी चालवत होता.दक्षिण रहदारी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.