अँटी करप्शन विभागाने भ्रष्ट अधिकारी आणि लाच घेणाऱ्यांवर जलदगतीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
काल सोमवारी खानापूर येथे धाड टाकल्यावर मंगळवारी महा पालिकेचे माजी अभियंता किरण सुब्बाराव यांच्या घरावर धाड टाकून अवैध रित्या कमावलेली संपत्ती जप्त केली आहे. बेळगाव सह राज्यातील अनेक अधिकाऱ्यांवर ही धाड पडली आहे.
बेळगाव शहरातील चन्नम्मा नगर येथील ए इ इ सुुब्बाराव यांच्या घरी मंगळवारी पहाटे पासून रेड टाकण्यात आली आहे. ए सी बी डी सी पी अमरनाथ रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ए सी बीच्या पथकाने ही धाड टाकली आहे.
दोन दिवसा पूर्वीच अजय देवगण अभिनित धाड वर आधारित ‘रेड’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे या चित्रपटाचा परिणाम ए सी बी अधिकाऱ्यां वर झाला आहे की काय म्हणून धाडी टाकण्याचा सिलसिला सुरू झाला आहे.