न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाही मच्छे हलगा बायपास चे उदघाटन करण्याचा प्रयत्न निवडणुकीच्या तोंडावर आज सुरू आहे. याला विरोध करण्यासाठी जमलेल्या शेतकऱ्यांना पावसानेही जोरदार दाखल होऊन बळ दिले. सुपीक जमीन हिसकावून घेऊन बायपास करणे निसर्गालाही मान्य नाही हेच दिसले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उदघाटन करण्याची तयारी झाली. सगळीकडे फलक उभारले गेले मात्र पर्जन्य राजाने ऐकला आवाज तो शेतकऱ्यांचाच.
पावसात राबणाऱ्या शेतकऱ्यांना या पावसाने आनंद दिला आणि गडकरींच्या स्वागताला आलेले नेते पांढरे कपडे घाण झाल्याने तितर बितर झाले.उभारलेले फलक पडणे पंडाल उखडणे म्हणजे निवडणूक डोळ्या समोर ठेऊन रस्ते उदघाटन करणाऱ्या भाजपला निसर्गाने दिलेली ही चपराक आहे अशी भावना अलारवाड क्रॉस येथे जमलेले शेतकरी व्यक्त करताना दिसत होते.