३१ मार्च रोजी शरद पवार यांच्या बेळगावला येण्याने मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीची शक्ती वाढणार आहे, या गोष्टीकडे सरकारने डोळेझाक करू नये, मुख्यमंत्र्यांनी याचा शांत आणि गांभीर्याने विचार करावा, असे पत्र बेळगावातील कन्नड संघटनांचे नेते अशोक चंदरगी यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
I
१९८६ मध्ये पवार यांच्या येण्याने समिती बळकट झाली होती, पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सरकार जिल्ह्याचे विभाजन करू पाहत असून तेही या परिस्थितीत कर्नाटकाच्या दृष्टीने कसे घातक आहे, हे या पत्रात लिहिण्यात आले आहे.
समितीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी शरद पवार यांचा वापर करून घेतला जाईल यामुळे सीमाभागात पुन्हा कर्नाटक विरोधी कृत्ये वाढतील याची नोंद घ्यावी. देवराज अर्स, रामकृष्ण, येडीयुरप्पा, एच डी कुमारस्वामी सारख्या मुख्यमंत्र्यांनी राबवलेल्या धोरणानुसार वागावे असेही पत्रात म्हटले आहे.