मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आगामी 19 मार्च रोजी बेळगाव जिल्ह्यातून गोकाक आणो चिकोडी असे दोन वेगळे जिल्हे निर्माण करून विभाजन करण्याची तयारी चालवली असतानाच बेळगावातील कन्नड संघटनांनी जिल्हा विभाजन करण्यास तीव्र विरोध केला आहे.
सध्या जिल्ह्यात असलेलं कन्नड भाषिकांच प्राबल्य कमी होऊन बेळगाव खानापूर किततुर आणि बैलहोंगल या चार तालुक्यांच्या बेळगाव जिल्ह्यात मराठी जणांचे वर्चस्व होऊ शकते याची भीती कन्नड संघटनांना आहे. चिकोडी आणि गोकाक हे दोन नवीन जिल्हे झाल्यास बेळगावातील राजकारणातून अनेक जण बाजूला जाऊ शकतात त्यामुळं या विभाजनास कन्नड संघटनांनी तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे.
अशोक चंदरंगी, माजी महापौर सिद्दनगौडा पाटील, करवे महादेव तलवार आदींची जिल्हा विभाजन संदर्भात बैठक झाली या बैठकीत जिल्हा विभाजनास विरोध करण्यात आले.1997 च्या काळात बेळगावच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री जे एच पटेल यांनी तिन्ही जिल्ह्याचं विभाजन केलं असता कन्नड संघटनांनी एक महिना आंदोलन करत निर्णय मागे घेण्यास भाग पाडले होते.
आता यावेळी जिल्हा विभाजन होतो का हेच पहावे लागेल.आगामी विधान सभा निवडणुकीत काँग्रेस चिकोडी आणि गोकाक बेल्ट मध्ये याचा फायदा होऊ शकतो यामुळेच सिद्धरामय्या जिल्हा विभाजनाची जुनी मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत