Monday, December 23, 2024

/

एम डी लक्ष्मीनारायण आर एस एस चे मेसेंजर?

 belgaum

केपीसीसीचे माजी सदस्य शंकर मुन्नोळी यांनी एक गंभीर आरोप केला आहे. विधानपरिषद सदस्य एम डी लक्ष्मीनारायण हे काँग्रेस मध्ये राहून आरएसएस व बिजेपीचे मेसेंजर म्हणून काम करत आहेत असा हा आरोप आहे. एम डी यांचे येडीयुरप्पा व शोभा करंदलाजे यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत आणि ते गुप्त गोष्टी त्यांना कळवतात, त्यामुळे त्यांना काँग्रेस मधून काढून टाकावे. असे मुन्नोळी यांचे मत आहे.

Shankar munvalli
काँग्रेस पक्षाच्या संघटनेसाठी काम करणारे हजारो कार्यकर्ते आहेत. मात्र त्यांना बाजूला ठेऊन लक्ष्मीनारायण यांना मागास जाती विभागाचे अध्यक्ष करणे चुकीचे आहे. तुमकुरहून बेळगावला येऊन बेळगाव दक्षिणचे तिकीट ते मागत आहेत, काँग्रेस पक्षाने त्यांना परत बोलावून घ्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मागास जातीत १०९ उपजाती आहेत, त्यापैकी फक्त ९ जातींच्या प्रमुखांना स्थान देऊन काँग्रेसने उर्वरित ९२ उपजातींच्या प्रमुखांना कचऱ्याच्या टोपलीत फेकत असून अन्याय करीत आहे. यामुळे लक्ष्मीनारायण यांना बेळगाव दक्षिणचे तिकीट मिळेल किंवा न मिळेल अन्याग्रस्थ समूहाचे प्रमुख काँग्रेस पक्षाला योग्य धडा शिकवतील असा इशाराही दिला आहे.
मला पार्टी फ़ंड नको मी समर्थ आहे, असे पक्षाच्या वरिष्ठांना कळवले आहे. मला तिकीट दिल्यास मी जिंकून दाखवतो असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.