कणबर्गी येथील सिद्धेश्वर मंदिर हे फक्त आम्हा ग्रामस्थांचे देवालय नसून संपूर्ण भागाचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराचे बांधकाम काही राजकीय लोकांच्या आदेशाने थांबवण्याचा प्रयत्न वनखाते करत आहे. पण आम्ही त्या दबावाला बळी न पडता सिद्धेश्वर मंदिर बांधणारच असा इशारा माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी दिला.
गुरुवारी वन खात्यातर्फे परवानगी विचारून हे बांधकाम बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली गावातील नागरिकांनी विरोध केला पण वनखाते हटले नाही, शेवटी तुम्ही आमदारांना भेटून या असे त्यांनी सांगितले. यामुळे हे काम थांबवणारा कोण हे समजून आले आहे.
आता ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. बांधकाम रोखणाऱ्यांना बघून घे असे आवाहन आता जागृत सिद्धेश्वराला करण्यात आले आहे.