३१ मार्च रोजी बेळगाव मध्ये समितीचा मेळावा होणार. सीमाप्रश्नाचे मार्गदर्शक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार येणार. समिती बळकट होणार आणि राष्ट्रीय पक्षांची वाट लागणार, आणि हो समितीचे जास्तीतजास्त उमेदवार निवडून येणार….. हे सारे टाळण्यासाठी पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्याचे भवितव्य अधांतरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
या मेळाव्याला जागाच मिळू नव्हे अशी व्यवस्था करण्यात आली आहे. खरेतर दोन ठिकाणी मेळाव्यासाठी जागा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकतर ज्योती कॉलेज मैदान आणि सिपीएड मैदान. यापैकी सिपीएड मैदानावर मेळावा घेण्यासाठी एरव्ही १ लाख भाडे घेणाऱ्या कॉलेज प्रशासनाने चक्क ३ लाख रुपये भाड्याची मागणी केली आहे, समिती नेत्यांना हे भाडे परवडणारे नाही, याचा विचार करून हा घाट घालण्यात आल्याचा आरोप होत आहे.
ज्योती कॉलेज मैदानास परवानगी देणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने टाळले आहे. येथे फक्त शैक्षणिक आणि क्रीडा उपक्रम होऊ शकतात असे सांगून राजकीय कार्यक्रम करायचा असल्यास डिफेन्स इस्टेट बंगळूर कडे बोट दाखवण्यात आले आहे. तेथे प्रवेश मिळवण्यासाठी पीआरओ विकास कलघटगी दाखल झाले आहेत, आता काय होते हे अजून नक्की नाही.या दोन्ही मैदाना नंतर वॅक्सिन डेपो हा एक पर्याय आहे पवारांचा 31 मार्चचा टी पी आला असून पोलिसांनी मैदानाची परवानगी दिल्यास सभेची परवानगी देणार असल्याची माहिती मिळाली आहे.