‘सीमा प्रश्नाची लढाई स्वार्थाची नाही तर त्यागाची आहे’ हे वाक्य बेळगावातील अनेकांना लागू होतंय त्यापैकीच त्याग दिलेल्या ज्या महिला नगरसेविकेला लागू होतंय त्यापैकीच एक,… समितीचे नाक आणि अत्यंत संघर्ष असलेल्या वार्डातून नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या, सुधाताई भातकांडे यांनी देखील जर का महिलांना उमेदवारी मिळत असेल आपला विचार व्हावा असा विचार समोर आणला आहे.
आमचे सारे घराणे पूर्वीपासूनच समितीशी बांधिलकी जपणारे आहे. माझे वडील बहिर्जी अण्णाजी घोरपडे,हलगा हे समितिनिष्ठ कट्टर कार्यकर्ते होते. समितीच्या प्रत्येक कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्याचंच अनुकरण म्हणून माझं हे काम सुरू आहे माझ्या वडिलांनी रंगूबाई पॅलेस वरून दोन मजली वरून उडी घेऊन पोलिसांच्या हातावर तुरी देत वडील निसटले होते सीमा प्रश्नासाठी स्वातंत्र्य सेनानी पेन्शन त्यांनी नाकारली होती त्यांचाच वसा घेऊन मराठी साठी माझं कार्य सुरू आहे अशी आठवण नगरसेविका सुधा भातकांडे यांनी काढली.
प्रत्येक आमदारकी निवडणुकीत माझ्या मूला बाळांचा विचार न करता काम केले आहे.आता महिलांना उमेदवारी द्यावी असा विचार सुरू असल्याने आपण सक्रिय कार्यकर्ती असल्याने यावेळी निवडणुकीत भाग घेण्याचा विचार करत आहे.समितीच्या नेत्यांनी एकीने जर उमेदवारी दिली तर मी निवडणूक लढवण्यास तयार आहे. बेळगाव दक्षिण मतदार संघात दक्षिण मधील महिलांनाच उमेदवारी देण्यात यावी असे आपले स्पष्ट मत आहे असेही त्या म्हणाल्या.
महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केले पण कोणतेही महत्वाचे पद मिळाले नाहीत्याग केला आहे याचा विचार करून संधीचे सोने करून घ्यावे असे मला वाटते. वरिष्ठ आहे आणि अटीतटीच्या लढाईत नगरसेवक म्हणून निवडून आल्याने आपल्याला महापौरपदी संधी दिली जाईल असे वाटले होते पण तसे झाले नसल्याने यावेळी तरी आमदारकीसाठी विचार व्हावा ही विनंती आहे अशी मागणी देखील त्यां समिती नेतृत्वा कडे करणार आहेत.
दक्षिण मतदारसंघातील आपण प्रबळ महिला उमेदवार आहे. महिला आघाडीची उपाध्यक्षा आणि दक्षिण महिला संघटनेची अध्यक्षा म्हणून काम करत असून शेकडो महिलांचे नेतृत्व मी करत आले आहे या कार्याचा आढावा समिती नेतृत्वाने घ्यावा अशी दावेदारी सांगताना मात्र समिती नेतृत्व कुणाला उमेदवारी देईल त्याच्या साठी आपण सक्षमपणे कार्य करणार असल्याचंही त्यांनी पुढे नमूद केल.