शिस्त संयम शांती आणि सौहार्द हे पोलीस खात्याने स्वतः पाळून जनतेला कायदा आणि सुव्यवस्था पाळायला प्रेरणा द्यावी. स्वास्थ समाज निर्माण करण्याची महत्वाची जबाबदारी पोलीस खात्यावर आहे पोलिसांनी जबाबदारी पेलण्यासाठी नेहमी सज्ज राहावं असे आवाहन राज्य पालिस महासंचालक (dgp) निलमनी राजू यांनी केलं आहे.
खानापूर येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्य 23 नागरी पोलीस दलाच्या तुकडीच्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पथसंचलन कार्यक्रमात सहभागी झाल्यावर त्या बोलत होत्या.यावेळी के एस आर पी ए डी जी पी भास्कर राव,प्रशिक्षण विभागाचे आय जी पी पदम कुमार गर्ग,के एस आर पी आय जी पी चरण रेड्डी,बेळगाव पोलीस आयुक्त डी सी राजप्पा,पोलीस उपायुक्त सीमा लाटकर,खानापूर पोलीस ट्रेनिंग केंद्राचे एम कुमार आदि उपस्थित होते.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलिसांनी देश प्रेम आणि भारतीय यत्व मनात बाळगून कर्तव्य पार पडावे असे आवाहन देखील निलमनी राजू यांनी पार पाडले आहे.