एकीकडे डिजिटल इंडिया चे नारे लावले जातात असताना अजूनही आधार कार्ड साठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. बेळगाव शहरात अजून ही डिजिटल क्रांती होऊ शकली नाही आणि यंत्रणा सुधारली नाही.
तहसीलदार कार्यालयात असलेल्या आधार केंद्रावर सकाळी १० पूर्वी पासून गर्दी आहे. फक्त एकच कर्मचारी काम करत आहे. मोजकेच फॉर्म देऊन बाकीच्यांना वाट बघायला लावली जाते. दुसरे केंद्र गोवावेस ला असून तेथेही हीच अवस्था.
स्मार्ट जमान्यात रांग लावून थांबण्यापलीकडे लोकांकडे पर्याय नाही.