भाजी मार्केट आणि सीबीटी च्या मधोमध सुरू करण्यात आलेल्या इंदिरा कॅन्टीनला प्रचंड गर्दी होत आहे. आज सकाळी नाश्त्याचे पदार्थ फक्त ९० मिनिटात संपून गेले आहेत.
इंदिरा कॅन्टीन एकावेळी ५०० जणांना जेवण देऊ शकते. पूर्ण दिवसात १५०० जणांची व्यवस्था होऊ शकते. ५०० जेवण दुपारी, ५०० जेवण रात्री आणि ५०० नाष्टा करण्याची क्षमता एक कॅन्टीन मध्ये आहे.
सध्या एकच केंद्र असल्याने प्रचंड गर्दी होत आहे. सिव्हिल हॉस्पिटल, एपीएमसी, नाथ पै चौक व गोवावेस शॉपिंग कॉम्प्लेक्स येथेही सुरू होणार आहेत. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ही केंद्रे सुरू होणार आहेत.
सकाळी ८ ते दुपारी १२.३० व सायंकाळी ७.३० असा वेळ आहे. नाश्त्यासाठी ५ आणि जेवणासाठी फक्त दहा रुपये भरावे लागणार आहेत. यामुळे घरी जेवण करणे आता पूर्णपणे थांबण्याचीच शक्यता आहे.