एकेकाळी राष्ट्रीय भारतीय जनता पक्षाच्या मागे आपली शक्ती पणास लावून उभा असलेल्या जैन समुदायावर काँग्रेस मेहरबान झाला आहे. या समुदायाने भाजपला पूर्ण साथ देऊन देखील राजकीय दृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या कोणतीच कृपा दृष्टी केली नसल्याने जण समुदायात मोठी नाराजी आहे त्यामुळे हा समाज काँग्रेस कडे साथ देण्यासाठी सरसावत आहे.
तत्कालीन यु पी ए सरकारचा कार्यकाळ संपत असताना पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी जैन धर्माला अल्पसंख्याकाचा विशेष दर्जा देण्याचा निर्णय घेतला विशेष म्हणजे हा विषय अखिल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वतः हाताळून जैन समुदायाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण केली आणि या निर्णयाचे देशात सार्वत्रिक पणे स्वागत झाले.कर्नाटकात श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वर मूर्तीच्या महा मस्तकाभिषेक कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारने 200 कोटी अनुदान मंजूर केले पण आजतागायत भाजपच्या केंद्र सरकारकडन एक कवडी देखील श्रवणबेळगोळला दिले नाहीत. ज्या जिल्ह्यात श्रवणबेळगोळ हे जैन धर्मियांचे महत्वाचे धार्मिक स्थळ आहे त्या हासन चे खासदार व माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी नवी दिल्ली मुक्कामी पंतप्रधान मोदी यांची स्वतः प्रत्यक्ष भेट घेऊन निधीची मागणी केली होती त्याकडेही पंतप्रधानानी कानाडोळा केला होता तोच रोष जैन समाजात असून त्याचेच पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीत उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.या सर्वाचा लाभ निश्चितपणे काँग्रेसला होईल असे राजकीय निरीक्षक मानतात.
बेळगाव जिल्ह्यात जैन समाज फार मोठ्या संख्यने विखुरलेला आहे त्यामुळं जिल्ह्यातील 18 मतदार संघा पैकी सुमारे 10 मतदार संघात प्राबल्य आहे.सदलगा,निपाणी अथणी आणि कागवाड आणि बेळगाव उत्तर मतदार संघात या समुदायाची मते निर्णायक आहेत त्यामुळं प्रत्येक राजकीय पक्ष जैन समाजाला देखील आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत विशेष म्हणजे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात अभयचंद्र जैन यांना मंत्री पदाच स्थान देण्यात आलं होतं त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला होता.
बेळगाव उत्तर मतदार संघात बऱ्यांपैकी जैन समुदायाची संख्या आहे गत विधानसभा निवडणुकीत पारंपरिक भाजपची वोट बँक असलेल्या या समुदायाने कॉँग्रेसनेच जैन धर्माला अल्पसंख्याकाचा दर्जा मिळवून दिला होता त्यामुळे भाजप ऐवजी अधिकृत काँग्रेस उमेदवार फिरोज सेठ यांना मतदान केलं होतं आणि तिचं मते निर्णायक ठरली होती.