ग्रामीण मतदार संघातील भाजपचे विद्यमान आमदार संजय पाटील यांना पुन्हा ग्रामीण मतदार संघातून पुन्हा निवडून न येण्याची खात्री न राहिल्यानेच की काय गेल्या सहा महिन्या पासून नव्या मतदार संघाच्या शोधात आहेत.या प्रमाणेच भाजप हाय कमांडने त्यांचं नाव उत्तर मतदार संघात संभाव्य उमेदवार म्हणून शिफारस केली आहे.
वास्तविक पणे संजय पाटील हे ग्रामीण मतदार संघातून भाजपच्या तिकिटावर दोन वेळा विजयी झाले आहेत मात्र तिसऱ्या टर्म मध्ये ते मतदारांच्या विश्वासास पात्र राहू शकले नाहीत नेमकी तीच भीती त्यांच्या मनात घर करून असल्याने त्यांनी हाय कमांडला आपण ग्रामीण मध्ये इच्छुक नसल्याचं लिहून दिल्याची चर्चा आहे या शिवाय एकीकडे ‘लक्ष्मीच्या झंझावात’ आणि दुसरीकडे जय महाराष्ट्र च्या घोषणेला घाबरून त्यांची वाटचाल उत्तरेच्या दिशेने चालल्याचे स्पष्ट झाले आहे.
संजय पाटील यांनी ग्रामीण मधून आपला मोर्चा उत्तरेकडे वळवल्याने रिक्त असलेली ग्रामीणची जागा आता अलीकडेच भाजपात प्रवेश मिळवलेल्या शिवाजी सुंठकर यांनी बळकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.सुंठकर यांना भाजपात आणण्यात खासदार प्रभाकर कोरे आणि आमदार महंतेश कवटगीमठ यांचं मोठं योगदान आहे भाजपच्या उमेदवार निवड मार्गसुचो प्रमाणे अलीकडे भाजप प्रवेश केलेल्यांना उमेदवारी देऊ नये किमान अश्या उमेदवारांनी भाजपात किमान पाच वर्षे काम केलं असल पाहिजे अशी अट आहे मात्र कदाचित ग्रामीण मध्ये भाजपकडे चेहरा नसल्याने मराठा म्हणून सुंठकर हे पर्याय होऊ शकतात व तो अपवादही ठरू शकेल.