Wednesday, January 22, 2025

/

सीमा वासीयांची चातका प्रमाणे महाराष्ट्रात वाट पाहतोय- राजू शेट्टी

 belgaum

आमच्या पासुन दुरावलेली पोर आम्हाला कसे भेटतील यांची आम्ही चातकाप्रमाणे वाट पहातोय.. हा दिवस लवकरच येइल असा माझा विश्वास आहे सीमा वासियांच्या बाबतीत राजू शेट्टी यांच मत व्यक्त केल आहे.
पत्रकार विकास अकादमी तर्फे आयोजित कै बाबुराव ठाकुर पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते, गोगटे रंग मंदिर शेजारील शानभाग हॉलमध्ये हा सोहळा पार पडला.व्यासपीठावर माजी महापौर संजोत बांदेकर, किरण ठाकूर, राजेंद्र गड्यांनावर, उपमहापौर मधूश्री पुजारी व सुभाष धुमे उपस्थित होते.


विशेष गौरव पुरस्कार मंगसुळी चे दैनिक पुढारी चे वार्ताहर शिवाजी पाटील, युवा पत्रकार पुरस्कार दैनिक तरुण भारतच्या अस्मिता कंग्राळकर, उत्कृष्ट छाया चित्रकार म्हणून पी के बडीगेर(माहिती वार्ता खाते) तर इलेक्ट्रॉनिक मीडिया विभागात सुभानी मुल्ला इन बेलगाम यांना प्रदान करण्यात आला तर पत्रकारितेत १०० वर्ष पूर्ण झाल्या बद्दल दैनिक तरुण भारतचे संपादक kiran ठाकूर यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला.
लोकसभा आणि विधान सभा ही मंदिर आहेत अस सांगितले जात… पन या मंदिरातील काही पुजाऱ्याच खर रुप काय आहे ये मी योग्य सांगेन अस म्हणत राजू शेट्टी यांनी विचार स्वातंत्र्यावर गदा आणण्याच काम केल जातय का ? असा मला प्रश्न पडला आहे.. विचाराला संपविण्यासाठी गोविंदराव पानसरे; दाभोळकर यांची हत्या करण्यात आली … विचाराला अशा प्रकारे संपवीने योग्य नाही. लेखनीची एक ताकद आहे; त्या मुळे लेखनीचे स्वातंत्र्य आबाधीत राखण्यासाठी जिव धोक्यात घालून पत्रकाराणी लेखनी उचलली पाहिजे अशी अपेक्षा राजे शेट्टी यानी उपस्थित केलाय चळवळ करत आसताना पत्रकाराचे चांगले वाईट अनुभव आले… वाईट अनुभव मी एक दिवस पुस्तकातुन समोर आणेन असेही ते म्हणाले. लोकसभा आणि विधानसभेत आलेले अनुभव मी आत्ता सांगितले तर माज्यावर हक्कभंग प्रस्ताव येइल..त्या मुळे या वर मी राजकारणातुन निवृत्त झाल्यानंतर बोलेन असे देखील खासदार शेट्टी यांनी पुढे नमूद केल.

यावेळी बोलताना झी मिडियाचे संपादक म्हणाले की पत्रकारितेचि वाटचाल खडतर आहे, जे चांगलं घडतं ते दाखविले पाहिजे, सत्याशी बंदबीलकी राखली जाईल तेव्हाच योग्य समाज घडेल, संवादी पत्रकारितेची सध्या गरज आहे. वाईट दिवस जातात तसेच पत्रकारितेतील वाईट दिवस नक्कीच जातील सध्या काहीच बरा काळ नाही, तन, मनं आपण वृत्तपत्रांच्या पाठीशी राहिले पाहिजे असेही ते म्हणाले. विकास अकादमीचे सचिव प्रसाद प्रभू यांनी सूत्रसंचालन तर नेताजी जाधव यांनी आभार मानले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.