?मेष-हा सप्ताह आपणास उत्तम असा राहील काही दिवसापासून रेंगाळत राहिलेली कामे या सप्ताहात पूर्ण करू शकाल.आपल्या कडून एखादे चांगले काम होईल त्यामुळे वरिष्टकडून आपले कौतुक होईल. त्यामुळे मन प्रसन्न राहील.व्यापारी वर्गाला कामानिमित्त परदेशी जाण्याचे योग येतील.विद्यार्थी वर्गाला यश दायी सप्ताह राहील.वाहन खरेदीचे योग.कुटूंबात आनंदाचे वातावरण राहील.
?वृषभ-या सप्ताहात आपला नोकरी व्यवसाय प्रगतीपथावर राहील त्यामुळे पैसा हातात शिल्लक राहील.व्यापारी वर्गातील लोकांना नवीनगुंतवणूक यश मिळेल.नोकरीच्या शोधात असाल तर नोकरी मिळेल.तसेच या काळात खाण्यापिण्याच्या सवयी कडे विशेष लक्ष द्यावे कारण या काळात पोटा संबंधी तक्रारी जाणवतील. बाहेरचे खाणे टाळावे.महिलांना काही तरी नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल.
?मिथुन-हा सप्ताह आपणास मध्यम फल दायी राहील.नोकरीत असणाऱ्याचे वरिष्टाशी मतभेद होतील.त्यामुळे मानसिक त्रास होईल.कोर्टकचेरी कामात अडथळा निर्माण होतील.व्यापारात असणाऱ्यांनी या काळात नवीन व्यवसाय सुरू करत असाल तर काळजी पूर्वक केल्यास यश मिळेल. या काळात महिलांनी घरातील वयस्कर लोकांच्या तब्येतीची काळजी घ्यावी .
?कर्क-या काळात आपणास खर्च जपून करावा लागेल.खर्चाचे प्रमाण वाढेल.त्यामुळे आपले वेळापत्रक कोलमडले मानसिक त्रास होईल.उष्णतेचे विकार होतील.व्यवसायात असणाऱ्यांना आर्थिक फायदा होईल.विद्यार्थी वर्गाने अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे.महिलांना कामाचा ताण वाढेल.
?सिंह-याकाळात आपणास प्रवासाचे योग येतील.घरात एखादे मंगलकार्य ठरेल.तसेच ज्यांना गुडग्याचे त्रास असतील त्यांनी काळजी घ्यावी.तसेच नवविवाहिताना संतती प्राप्तीचे योग येतील.या काळात तरुणांनी वाहन जपून चालवावे.व्यवसायात चढ उतार होतील.
?कन्या-या काळात आपण करत असलेल्या कामात अडथळा निर्माण होतील.उष्णतेचे त्रास होतील.तसेच नवीन प्रॉपर्टी खरेदी करणार असाल तर कागदपत्रे नीट तपासून घ्यावी. वाहन व्यावसाईकां ना उत्तम काळ आहे.महिलांना जुन्या मैत्रिणी भेटतील.घरात वातावरण प्रसन्न राहील.आर्थिक व्यवहार जपून करावे उसने पैसे कुणाल देऊ नका.
?तुला-हा सप्ताह आपणास यशदायी राहील.मित्र मैत्रिणी चे सहकार्य लाभेल. सामाजिक कार्यात भाग घ्याल.मानसन्मान वाढेल.मुलांकडून चांगली बातमी मिळेल.तळ पायाला एखादी दुःखा पत होऊ शकते.विवाहयोग्य योग्य व्यक्तीचे विवाह जमण्याचे योग आहेत.त्या संदर्भात घरात बोलणी सुरू होईल.व्यापारी लोकांना काळ मध्यम राहील.
?वृश्चिक-या सप्ताहात घरात वादाचे प्रसंग निर्माण होतील.आपण रागावर नियंत्रण ठेवावे.नोकरीत असणाऱ्यांना बदली चे योग येतील.कोर्टकचेरी कामात यश येईल.मुलांना यश दायी सप्ताह.वाहन खरेदीचे योग येतील.व्यावसाईकांना लाभ दायी काळ.
?धनु-या सप्ताहात प्रवासाचे योग येतील. नवीन वर्षाच्या सुरुवातीला एखादी चांगली बातमी मिळेल.शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या ना नवीन संधी प्राप्त होतील सरकारी नोकरीचे योग येतील.तसेच घरात काही वेळा वादाचे प्रसंगआपणा मुळे निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावि.कुटूंबात धार्मिक कार्य होईल.
?मकर-आपण या काळात पैशाचे व्यवहार जपून करावे नुकसान होण्याचा संभव आहे. तसेच व्यापारात लाभ दायी सप्ताह .मित्र मदत करतील. महिलांना प्रवास घडेल मुलांना नवीन काही शिकण्याची संधी मिळेल.परंतु तब्येतीची काळजी घ्यावि.कामाचा ताण वाढेल.व्यावसायिकांना संमिश्र सप्ताह राहील.पैसे येईल पण खर्च पण तसाच होईल.
?कुंभ-कुटूंबिक सुखाचा सप्ताह घरात काही तरी सुखकारक घटना घडतील.कुटूंबासह कुठेतरी सहलीचा योग येईल.नोकरीत असणाऱ्यांनी आपल्या कामा कडे विशेष लक्ष द्यावे. वाहन चालवताना जपून चालवावे. महिलांना खरेदीचे योग येतील एखादी मूल्यवान वस्तू खरेदी कराल.पतीपत्नीत सौख्य वाढेल.
?मीन-हा सप्ताह तसा संमिश्र राहील.आपल्या प्रिय व्यक्तीच्या प्रकुर्ती ची काळजी घ्यावि प्रवासात त्रास होईल.या काळात लांबचे प्रवास टाळावे. व्यापारी लोकांना लाभदायक काळ तसेच कोर्टकचेरी कामात यश येईल.आपल्या बोलण्यावर मात्र नियंत्रण ठेवावे कुणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावि.
?ज्योतिषी ?
उषा सुभेदार
कोरेगल्ली, शहापूर,
बेळगाव
8762655792
Trending Now