आमच्यापैकी कुणालाही दक्षिणेतील भाजपची उमेदवारी द्या, अन्यथा शांत राहणार नाही. पडेल आणि भ्रष्ट उमेदवाराला उमेदवारी दिली जाऊ नये यासाठी बेळगाव दक्षिण मधील प्रबळ भाजप शक्तीने नेत्यांवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. बंगळूर येथे जाऊन सर्व राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्वाच्या गाठीभेटी घेण्यात आल्या आहेत.
बेळगाव दक्षिण मध्ये उमेदवारी वरून एक विरुद्ध बारा असे भाजपमध्ये वातावरण झाले आहे. यापूर्वी स्थानिक पातळीवर आवाज उठवून आमच्या समर्थनाशिवाय कुठलाही उमेदवार निवडून येऊ शकत नाही हे सांगितले आहे. तरीही विरोधी उमेदवार आपलीच उमेदवारी नक्की झाल्याचा प्रचार करत असल्याने आता या गटाने थेट बंगळूर कडे आपला मोर्चा वळवला आहे. आम्ही सगळे इच्छूक आहोत पण आमच्या पैकी कुणालाही एकट्याला उमेदवारी द्या, आम्ही प्रचंड बहुमताने त्याला निवडून आणतो, पण आमच्या मनात नसलेला उमेदवार दिला तर पराभव नक्की असे नेत्यांना सांगण्यात येत आहे.
या प्रकाराने आता बेळगाव दक्षिण मधील उमेदवारी वरून भाजप नेत्यांवरील ताण वाढला आहे.डॉ एस एम दोडमनी,पी डी धोत्रे,सुनील चौगुले,नीलकंठ मास्तमर्डी,दीपक जमखंडी,उमेश शर्मा ,तेजस्विनी धाकलुचे आदी बारा जण गेले दोन दिवस राज्यधानीत मुक्काम ठोकून आहेत त्यांनी वरिष्ठांच्या भेटी घेतल्या आहेत.