Thursday, December 12, 2024

/

मासेकर युवा नेतृत्व !

 belgaum

कोणताही लढा युवकांच्या हातात दिल्यास तडीला जाऊ शकतो  हा इतिहास आहे काळ्या दिनाच्या सायकल फेरीतआंदोलनात युवकांचा सहभाग पाहिल्यास त्यांना नेतृत्व देण्याची गरज बनली आहे यासाठी  गेली दहा वर्षे पालिकेत कार्यरत वडगांव भागातील युवा नेतृत्व रतन मासेकर यांचा देखील दक्षिण मतदार संघात नाव चर्चेस येत आहे.

यावेळी आपण निवडणुकीस प्रयत्न करावा अशी मागणी जनतेतून विशेषतः युवा वर्गातून जास्त येत आहे. शिक्षित आणि युवा उमेदवार म्हणून आपल्याकडे उमेदवारी भरण्याची मागणी लोक करत आहेत.वडगाव, जुने बेळगाव, शहापूर, मच्छे, येळ्ळूर, धामणे हट्टी येथून ही मागणी होत आहे. मागच्या वेळी तुम्ही अर्ज केला होता, यावेळीही प्रयत्न करून बघा, असे जनतेचे म्हणणे आणि कौल आल्याने मी विचार करत आहे.महाराष्ट्र एकीकरण समितीतील खंदा कार्यकर्ता ही आपली ओळख आहे. २००७ पासून सलग दोनवेळा बेळगाव पालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आलो आहे. समितीचा चांगला कार्यकर्ता म्हणून तिकीट मिळाले तर नक्कीच विजयी होईन नाहीतर जो उमेदवार दिला जाईल त्याच्यासाठी काम करायला तयार आहे अस म्हणणं आहे नगरसेवक रतन मासेकर यांचं..

Ratan masekar

आजवर शहापूर वडगाव भागात काहीही समस्या झाली, की पोलीस स्थानकाशी संपर्क ठेऊन एक वकील आणि कार्यकर्ता म्हणून निस्वार्थ मदतीची भावना आपण जपली आहे. मराठी साठी, मराठी माणसासाठी तसेच इतर भाषिकांवर अन्याय झाल्यास मी न्यायालयीन खटल्याची कामे मोफतरीत्या करत आलो आहे.सगळ्यांशी संबंध चांगले असल्याने पैशांचा विचार न करता मदतीची भावना जपत आलो आहे. समितीत बेकी नाहीच आहे आम्ही सर्व एकच आहोत, यामुळे दक्षिण मतदार संघात समितीचा विजय निश्चित आहे असेही त्यांनी बेळगाव live ला दिलेल्या मुलाखातीत म्हटलं आहे.

आज जनतेला आपले प्रश्न घेऊन लढणारा उमेदवार पाहिजे आहे. आम्ही रस्त्यावरची लढाई लढत आलोय पण जनतेला आपले प्रश्न विधानसभेत योग्य आणि अभ्यासूरीत्या मांडणारा आमदार पाहिजे आहे. भाषिक अल्पसंख्याक कायदा असो किंवा कर्नाटक भाषा धोरण असो यासाठी आमदाराने कर्नाटकाच्या विधानसभेत आवाज उठविला पाहिजे. तरच न्याय मिळवून घेण्याची प्रक्रिया सोपी होईल.हे सारे शिक्षित असल्याने आणि वकील असल्याने मी करू शकेन तसेच इंग्रजी व इतर भाषांचे ज्ञान असल्याने आपला प्रभाव पडेल असेल जनतेला वाटत असल्याने आपल्या उमेदवारीसाठी आग्रह होत आहे असाही दावा त्यांनी केलाय.

ते पुढे म्हणाले की मागच्यावेळी अर्ज केला तेंव्हा मी वयाने लहान असल्याचा मुद्दा आला होता, पण मागील पाच वर्षात अनुभवाने सक्षम झालो आहे. युवा असलो तरी प्रश्नांची आणि समस्यांची जाण असणारा जागृत युवा वकील आहे, यामुळे प्रयत्न करून पाहण्याची तयारी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.