तांगडी गल्ली कडून एक युवती अचानक रेल्वे ट्रॅक वर चढली, समोरून धडधडत येणाऱ्या रेल्वेच्या विरुद्ध दिशेने ती चालत निघाली, आता ती मरणार….. इतक्यात रेल्वेचालकाने रेल्वे थांबवली आणि तिला वाचवले…
शुक्रवारी दुपारी घडलेली ही घटना थक्क करणारी आहे. प्रेमात अपयश आले म्हणून या युवतीने हा मार्ग निवडला होता.
अखेर परिसरातील नागरिकांनी या युवतीला माजी महापौर विजय मोरे आणि सुनील बाळेकुंद्री ,संतोष ममदापुर, संजय वालावालकर यांच्या ताब्यात दिले.
तिला समजावून सांगण्याचा प्रयत्नही झाला पण आत्माहत्येच्या विचारातून ती बाहेर न पडल्याने तिची पाठवणी बालसुधारगृहात करण्यात आली.
Trending Now