पोलिसांनी महा पालिकेचे ठेकेदार डी एल कुलकर्णी यांच्यावर एट्रोसिटी( जाती वाचक शिवीगाळ करणे ) गुन्हा दाखल करा अशा मागणी दलित संघटनानी केली आहे. कुलकर्णी यांनी नगरसेवक सतीश देवर पाटील यांना मारहाण केल्याची तक्रार पोलीस स्थानकात केली होती मात्र यावर पोलिसांनी अजून कोणतीच कारवाई न केल्याने दलित संघटना सदर मागणी केली आहे.
सतीश देवर पाटील यांनी रस्त्याच्या विकास कामांच्या ठेकेदार कुलकर्णी जाब विचारला असता पालिका कर्मचाऱ्या समोरच मारहाण केल्याची घटना घडली होती . महापौर बसाप्पा चिकलदिनी यांना दलित संघटनांनी निवेदन देत मागणी केली आहे विकास कामे माहिती घेणाऱ्या नागरसेवकास अशी मारहाण झालेली घटना दुर्दैवी असून ठेकेदारवर एट्रोसिटी दाखल करा असं देखील म्हटलं आहे .