Monday, December 30, 2024

/

माझी श्रद्धा लढ्यावर-प्रकाश मरगाळे

 belgaum

सीमा लढ्याच्या केस मध्ये सतत पाठपुरावा ,समितीचे मेळावे असले की पेंडाल पासून परवानगी मिळे पर्यंत सतत धडपड करत असलेले मध्यवर्ती समितीचे बॅकबोन म्हणून ओळखले जाणारे, प्रकाश मरगाळे दक्षिण मतदार संघातून इच्छुक आहेत त्यांची देखील दावेदारी प्रबळ मानली जात आहे.

Prakash margale

आपण १९६९ पासून सतत ५० वर्षे समितीचा कार्यकर्ता आहे. कधीच कुणाकडे कोणतेही पद न मागता हे काम सुरू आहे. ना मध्यवर्ती ,ना शहर समिती, ना नगरसेवक ना आमदारकी कसलीही अपेक्षा ठेवली नाही. माझ्या लढ्यावर माझी श्रद्धा आहे. यामुळे मी आज पर्यंत कुणाला पार्टी देऊन माझे नाव पुढे करा अशी गळ घातली नाही आणि कुणाला भेटून उमेदवारीसाठी हातही पसरले नाहीत. पण आता मात्र जनतेच्या गाठीभेटी घेऊन विनंती करणार आहे असे त्यांनी बेळगाव live ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

पदांची अपेक्षा कधीच नव्हती. काम बघूनच आजवर जबाबदारी आणि आर्थिक दृष्ट्या बाजू सांभाळण्यासाठी पदे देण्यात आली. मी बेम्को मध्ये कामगार असताना, सामान्य कामगार आपल्या तुटपुंज्या पगारातून रुपया ..दोन रुपये सिमालढ्यासाठी मदत देत,त्या चळवळीची जाणिव ठेवून १९९९ पासून आजपर्यंत सर्व आर्थिक जबाबदाऱ्या पूर्णपणे पार पाडल्या आहेत. १९९९ पासून १ नोव्हेबर किंवा १७ जानेवारीला कोणत्याही दुसऱ्या माणसाने एक नया रुपया खर्च केलेला नाही, ती जबाबदारी आपण पेलत आलो आहे.

२००६ पासून सीमाप्रश्नाचे जेवढे मेळावे झाले त्यासाठी आपण स्वतः ४० ते ५० लाख रुपये खर्च केले आहेत. जनतेतून केवळ दीड ते दोन लाख रुपये आले बाकीचा संपूर्ण आर्थिक भार मी शिरावर घेतला.सीमाप्रश्नाच्या खटल्यासाठी आपले वैयक्तिक १० लाख रुपये घातलेले आहेत. माझ्या साथीदारांनी कर्जे काढून पैसे घातले असून एकूण दीड कोटी रुपये खर्च केला आहे. हे सर्व करत असताना कुणाला आपला पाठींबा द्यायचा हे जनतेने ठरवावे अस देखील त्यांनी स्पष्ट केलं.

ते पुढे म्हणाले की २००४ पासून खटल्याच्या आणि एकूण लढ्याच्या कामात प्रत्येक मिनिटाला पाठपुरावा करत आहे, उगीच आठवण आल्यावर सीमाप्रश्न असे कधीच वागलो नाही. सतत वकिलांशी संपर्क असतो आणि सीमाप्रश्न हाच श्वास झालाय म्हटल्यास हरकत नाही, यामुळे जनता नक्कीच विचार करेल.मराठा समाज भवन उभारणीस समोपचारातून जागा मिळवून देऊन तिथे इमारत उभारणीचे काम सुरू आहे.९७ वर्षे मराठा समाजाला स्वतःच्या अस्तित्वाची जागा नव्हती ती आपण मिळवून दिली. समितीसाठी तर कार्यालय नव्हते तेही २००४ पासून मी चालू केलं.फोन सारख्या व्यवस्था ठेवल्या.बेळगाव मध्ये मराठा क्रांती मोर्चा आयोजित करण्यात योगदान मोठे आहे.

१९८० साली समितीची सायकल फेरी  बंद पडली होती. सलग १५ वर्षे ती बंद होती .१ नोव्हेंबर १९९५ पासून ती परत चालू केली आहे. सीमाप्रश्नी अटक होणाऱ्या मंडळींना आजवर २ कोटी पर्यंतचे जामीन दिले आहेत.सहकार क्षेत्रात काम करताना तुकाराम बँकेत आपलं योगदान मोठं आहे. सीमाप्रश्नाशी निगडित ही बँक कार्यरत आहे. आजवर या बँकेने मराठा समाजाला आधार दिलाच पण सीमाप्रश्नी कागदपत्रे आणि इतर खर्चही याच बँकेच्या माध्यमातून सुरू आहेत.
पूर्वी इतर समाजांना पक्ष नव्हते. त्यामुळे ते समितीशी एकत्रित होते. पण पक्ष वाढले आणि ते विलग झाले. भाषेसाठी एकत्र या अशी मागणी केली तर इतर समाजही एकत्र येऊ शकेल अशी देखील भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.