लोकशाहीत मताला खूप महत्व आहे आणि राजकारणात मत विकण्या एवढे दुसरे पाप कोणतेच नाही त्यामुळे तुमची मते विकायला देऊ नका मत विकणे म्हणजे आपला स्वाभिमान विकल्या सारखेच आहे स्वाभिमान जपला पाहिजे.असा टोला किरण ठाकूर यांनी लगावला आहे राष्ट्रीय पक्षाकडून साडी भांडी दारू आणि मटण घेणाऱ्याना लगावला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला आघाडीच्या वतीने आयोजित महिला दिनाचे औचित्य साधून महिला सीमा सत्याग्रहींच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते. बुधवारी सायंकाळी लोकमान्य रंगमंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर माजी महापौर सरिता पाटील. उपमहापौर मधुश्री पुजारी,नगरसेविका सुधा भातकांडे,समितीचे उपाध्यक्ष टी के पाटील उपस्थित होते.यावेळी शहर आणि परिसरातील ३४ सीमा सत्याग्रही महिलांचा सत्कार महिला आघाडीच्या वतीने करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांना स्वाभीमाने जगण्याचा संदेश दिला होता जर का बाहेरचे येऊन तुमच्या विरोधात लढताहेत तुम्ही लढा त्यावेळी मावळ्यांनी शिवाजी महाराजांचं ऐकल होत स्वराज्यासाठी प्राण अर्पण केले म्हणून स्वराज्य उभे करता आले. घोट भर दारू मटण आणि साडीसाठी आपला स्वाभिमान गहाण ठेऊ नका असे आवाहन त्यांनी यावेळी केल.
सीमा लढ्यात मागील अनेक निवडणुकात महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे उमेदवारी वरून जर का मतदार संघात भांडण लागली तर तहाचा उमेदवार म्हणून सर्व मतदार संघात महिलांना उमेदवारी देऊन टाका एकदा तरी महिलांना देऊन प्रयोग करून बघूया इतकी वर्ष हा लढा चाललाय अजून एकदाही महिला आमदार झाली नाही यावेळेस योग्य ठिकाणी महिलेस उमेदवारी देऊन आमदार करून निवडून ध्या अस आवाहन देखील ठाकूर यांनी यावेळी केल.
माजी आमदारावर केली टीका
आज कल अंहिसा परमोधर्म म्हणणारे देखील मटण जेवण घालत आहेत असले दिवस आले आहेत हे त्यांच्या समजला देखील आवडले नाही अशी टीका देखील दारू मटण जेवण देणाऱ्या माजी लोक प्रतिनिधी वर करत मराठ्यांनी आशयाचे गुलाम न बनता आज महिलांनी जिजाऊ बनून हे सर्व आपल्या मुलांना सांगायची वेळ आली आहे असेही ते म्हणाले.