Friday, December 27, 2024

/

अप्पूगोळ ला कारागृहात आलिशान बराक, मिळते दारू अन बाहेरचे जेवण

 belgaum

राब राब राबून पैसे भरलेल्या लोकांना ठकवलेल्या संगोळ्ळी रायन्ना सोसायटीचा प्रमुख आनंद अप्पूगोळ याचे कारागृहातील जीवन आरामदायी आहे. यंत्रणेला पैसे चारून त्याने आलिशान बराक मिळवली आहे. त्याला रोज बाहेरून जेवण जाते. त्याला दिवसभर दारू लागतेच यामुळे दारूचा पुरवठाही होत असून त्याची आत मजा सुरू आहे. बाहेर आपले पैसे कधी मिळणार या त्रासात लोक वणवण फिरत आहेत.

APPUgol
अप्पूगोळ ने अभिनेत्री आणि मॉडेल्स च्या नादात सोसायटी डबघाईला आणली आहे. यासाठी त्याला अटक झाली होती. जामिनावर सुटल्यावर तो घरीच होता. रोजच्या रोज ठेवीदारांची येजा सुरू झाली. काय उत्तर द्यायचे हेच कळेना यामुळे त्याने यंत्रणेला हाताशी धरून पुन्हा अटक करून घेतली आहे.
इतके आलिशान व्यवस्था होत असल्याने अप्पूगोळ ला घरच्या पेक्षा कारागृहातच जास्त सुरक्षित वाटत आहे. थोडे पैसे पेरले की दारू आणि चमचमीत जेवण मिळत असल्याने त्याने हा मार्ग निवडला असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या ब्रँडची दारू आणि जेवण थेट त्याच्या बराकीत पोचविण्यासाठी भरपूर आर्थिक व्यवहार सुरू आहेत.
अप्पूगोळ च्या फसवणुकीचा आकडा ५०० कोटिपर्यंत जात आहे. त्याच्या मालमत्ता न्यायालयाने न विकण्याची सूचना केली आहे. तरीही लोकांचे पैसे देतो म्हणून सांगून त्याने फसवणूक सुरू केली आहे. काही मालमत्ता चोरून विकण्याचा प्रयत्नही झाला आहे, अशा व्यक्तीची कारागृहात बडदास्त ठेवली जात असून व्ही आय पी कैदी म्हणून तो वावरत आहे, याकडे वरिष्ठ कारागृह अधिकारी वर्गाने लक्ष द्यायला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.