सरकारी उर्दू शाळा क्रमांक ५ न्यू गांधीनगर येथील विध्यार्थ्यांना एकतर आपली लघवी अनेक तास रोखून धरावी लागते किंवा शाळेजवळून जाणाऱ्या रेल्वे ट्रॅक जवळ उघड्यावर मूत्र विसर्जन करावे लागत आहे.
या शाळेत स्वच्छतागृह नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. दोन वर्षांपूर्वी शाळेचा काही भाग कोसळला आहे, यामुळे क्लासरूम ची अवस्था अतिशय वाईट आहे.
पावसाने शाळा पडली तेंव्हा स्वच्छतागृहाची इमारत काही प्रमाणात शिल्लक होती.
मुली त्याचा वापर करीत होत्या. दहा पंधरा दिवसांपूर्वी तो भागही पडला आहे. मुले किमान उघड्यावर जातात मुलींनी काय करायचे हा प्रश्न आहे.
मुलींना सध्या घरी जाऊन परत यावे लागते आहे.
शिक्षिका आणि वयात आलेल्या मुलींची मोठी गैरसोय आहे. विशेषतः महिन्याच्या दर महिन्याच्या त्या ठराविक दिवसात त्यांचे हाल होत आहेत.
स्मार्ट सिटीची भाषा करताना आणि उद्या महिला दिन साजरा करताना ही शोकांतिका नव्हे काय?उत्तर आमदार केवळ हनुमान नगरलाच स्मार्ट करणार काय?हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.टॉयलेट एक प्रेम कथा या चित्रपटाचा बोध बेळगावतले लोकप्रतिनिधी घेतील का?