Thursday, December 26, 2024

/

कट्टर अस्मिता जपणाऱ्या येळ्ळूरच्या सुनबाई सरिता पाटील

 belgaum

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग ३२ मधून 2008 साली, पोटनिवडनुकीतून 2013 साली बिनविरोध नगरसेविका म्हणून गेलेल्या सरिता पाटील या 2016 साली महापौर पदी रुजू झाल्या कट्टर भाषिक अस्मिता जपणाऱ्या महापौर म्हणून त्याचं योगदान भरीव आहे त्यामुळेच त्या बेळगाव दक्षिण मतदार संघात कडव्या दावेदार म्हणून पुढे येत आहेत.

Sarita

कारवाई साठी एकीकडे शासनाचा प्रचंड दबाव असताना काळ्या दिनाच्या सायकल सहभागी होऊन गैरहजर राहिलेल्या महापौरांची परंपरा मोडीत काढत त्या काळ्या दिनात सहभागी झाल्या होत्या. सीमा प्रश्नांचे केंद्र बिंदू असणाऱ्या येळ्ळूर गावाच्या त्या स्नुषा आहेत काळ्या दिनात शासनाचा विरोध झुगारत कारवाईस न घाबरता येळ्ळूरची कडवी अस्मिता जपणारी महापौर म्हणून त्यांचा नाव लौकिक झाला आहे.

२००८ साली नगरसेविका झाल्या पासून आज पर्यंत समितीने पुकारलेल्या प्रत्येक कार्यक्रम,रस्त्यावरच्या  लढाया,मेळावे आंदोलनात सक्रीय सहभाग दर्शवला असून दिवंगत सासू कै लता पाटील यांच्या वारसा त्यांनी पुढे चालवत आहे आमच्या घरची चौथी पिढी रस्त्यावर सक्रीय आहे असे त्यांनी बेळगाव live ला दिलेल्या मुलाखातीत म्हटलं आहे.

काळ्या दिनात सहभागी झाल्यावर करवे कडून पुतळा दहन आलेली धमकी,पालिकेवर झालेला हल्ला,या सर्व गोष्टी असताना साहसाने पालिकेची बैठक घेऊन दाखवण्याची किमया साधली होती. राज्यद्रोहाचा खटला आणि पालिका बरखास्तीची टांगत्या तलवारीला वकिलांची मदत घेऊन कोर्टातून ठोस उत्तर दिल. आपल्या कार्यकाळात सर्वाधिक बैठका घेण्याचे कार्य केले आहे या सह स्मार्ट सिटी च्या कामात देखील आपलं महत्वपूर्ण योगदान असल्याच त्यांनी म्हटलंय.

महापौर पदी रुजू होताच पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कन्नड संघटनाशी दोन हात करण्याचा इशारा त्यांनी दिला होता, म्हणून अनेक कन्नड नगरसेवकां कडून देखील त्या अस्मितेवर हिट लिस्ट वर होत्या. कोल्हापूर येथे मंत्री चंद्रकांत दादा पाटलांच्या आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग होता असेही त्यांनी नमूद केल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.