कसाई गल्लीत महापालिकेने एकच बेकायदेशीर कत्तल खान्यावरील कारवाई ही केवळ फार्स दाखवणारी होती असा आक्षेप घेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयूक शशिधर कुरेर यांची भेट घेऊन पालिका कार्यक्षेत्रात चालणारे कत्तल खाने बंद करा अशी मागणी करण्यात आली.
मंगळवारी दुपारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका कार्यालयात जाऊन आयुक्त शशिधर कुरेर यांची भेट घेऊन चर्चा केली. सोमवारी पालिका अधिकाऱ्यांनी कसाई गल्लीतील बेकायदेशीर कत्तल खान्याची पाहणी केली त्यावेळी त्यांना जनावरांची वासरं दिसली नाहीत का ? पालिकेची ही भेट ठरलेली होती आयुक्त एकतर्फी कारवाई करत आहेत असा आक्षेप भाजप पदाधिकाऱ्यानी नोंदवला.
मागील सहा महिन्यापूर्वी ऑटो नगर येथे प्रदूषण नियंत्रण खात्याच्या अधिकाऱ्यांनी अहवाल दिल्या त्यावेळी आयुक्तांनी कत्तल खाण्यांचीपाहणी करून इथून पुढे असे कत्तल खाने बंद करू असं आश्वासन दिल होत मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचं लक्ष वेधलं. एकमेव अधिकृत कत्तल खाना कॅम्प मध्ये असताना कसाई गल्लीत दिवसा ढवळ्या जनावरांची कत्तल केली जाते. पालिका कार्यक्षेत्रात एकपण कत्तल खाना नाही असं बेजाबदार वक्तव्य करणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यास वक्तव्यास कोण जबाबदार असा जाब देखील भाजपने यानिमित्ताने उपस्थित केला. यावेळी पालिका आयुक्त कुरेर यांनी इथून पुढे बेकायदेशीर कत्तल खान्यावर कारवाई केली जाईल अस आश्वासन कुरेर यांनी दिल. यावेळी भाजप अध्यक्ष राजेंद्र हरकूनी, आमदार संजय पाटील, किरण जाधव अनिल बेनके,उज्वला बडवणाचे आदी उपस्थित होते.