Sunday, December 29, 2024

/

 ‘कुकरला’ विरोध करणाऱ्यास मारहाण

 belgaum

मत तुम्हालाच देतो अशी देवा समोर शपथ घ्या असे म्हणून कुकर वाटपास विरोध करणाऱ्या एकास मारहाण झाल्याची घटना वाघवडे येथे घडली आहे. दशरथ नेवगिरी वय 55 वर्ष असं कुकर वाटपास विरोध करणाऱ्या इसमाचे नाव आहे.
सध्या तालुक्यातील प्रत्येक गावात एका महिला नेत्या कडून कुकर वाटप करण्यात येत आहेत वाघवडे येथेही त्या महिला नेत्या कडून कुकर वितरण केले जात होते यावेळी आमच्या गल्लीत देवाची शपथ घेऊन कुकर वाटप करू नका असा विरोध केला त्यावेळी त्या महिला नेत्याच्या सुरक्षा रक्षकां कडून मारहाण करण्यात आली.यावेळी त्या गावातील समितीचे नेते होते त्यांनी दशरथ ची सुटका करून घेतली.

Coocker
आपला इमान आणि अस्मिता विकला काय?मराठी माणसाने आपला स्वाभिमान गहाण ठेवला काय ?कुकर साठी लाचारी पत्करणे कितपत योग्य?असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.देशात छ.शिवाजी महाराज जयंती निमित्य रस्त्यावरून रांगोळी काढताना महिला अनेकदा पाहिल्या आहेत मात्र  ग्रामिण भागातील मराठी महिला कूकर साठी रस्त्यावरून रांगोळ्या काढत आहेत कसल्या या जिजाऊ? अश्यांच्या पोटी शिवराय जन्माला येणार का?हा देखील मुद्दा या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
कुकर देताना मत त्या बाईनाच घालतो अशी शपथ घ्या अशी अट घातल्यावर विरोध केला म्हणून मारहाण झाली. उद्या निवडणुकीत पडल्यावर ज्यांना ज्यांना कुकर दिले त्या सगळ्यांना मारहाण करायलाही ही माणसे कमी करणार नाहीत, असे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.