हिंदू तिथीप्रमाणे शिवजयंती आणि नुतन उपमहापौर मधुश्री पुजारी यांचा सत्कार असा दुहेरी कार्यक्रम बापट गल्लीतील कालिकादेवी युवक मंडळाने आयोजित केला होता.सर्व उपस्थितांचे स्वागत महेश पावले यांनी केले, अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष सुनील केसरकर होते.
प्रमुख पाहुणे म्हणून मूर्तिकार संजय किल्लेकर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात उपमहापौर मधूश्री पुजारी व प्रमुख पाहुणे मूर्तिकार संजय किल्लेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.
नुतन उपमहापौर मधश्री पुजारी यांचा सत्कार महिला मंडळाच्या अध्यक्षा सुवर्णा कणबरकर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. तरमहाराष्ट्राचा प्रजासत्ताक दिनी बनवलेल्या चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तयार करण्याचा मान मिळवलेले मूर्तिकार संजय किल्लेकर यांनी एक मूर्तिकार म्हणून बेळगाव शहराचं नाव सात समुद्रा पार पोचवलं आहे अश्य्या मूर्तिकार संजय किल्लेकर यांचा सत्कार उपमहापौर मधुश्री पुजारी यांच्या हस्ते करण्यात आला. या वार्डाच्या नगरसेविका माया कडोलकर व माजी महापौर आप्पासाहेब पुजारी यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी माजी महापौर आप्पासाहेब पुजारी,सत्कार मूर्ती प्रसिद्ध मूर्तिकार संजय किल्लेकर,उपमहापौर मधूश्री पुजारी यांनी मनोगत व्यक्त केले.गल्लीतील पदवीधर विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अंकुश केसरकर तर आभार सुनील मुरकुटे यांनी मानले.शिवभक्त गजानन निलजकर यांनी शिवजयंती हिंदू तिथीप्रमाणे का साजरी करतात याबद्दल उपस्थितांना प्रबोधन केले.शेवटी प्रेरणा मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी बापट गल्लीतील पंच मंडळ,युवक मंडळ,महिला मंडळाचे कार्यकर्ते ,व्यापारी वर्ग,व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.