राष्ट्रीय पक्षांच्या अतिक्रमणात दक्षिणेचा गड जर समितीला शाबूत ठेवायचे असल्यास समिती नेतृत्वाला युवा उमेदवारास संधी द्यावी लागणार आहे.बेळगाव live ने केलेल्या चाचपणीत एकूण इच्छुकांत युवा चेहऱ्यात मजगाव येथील नेते संजय सातेरी यांचं नाव देखील आघाडीवर आहे.दक्षिण मतदात संघातील समितीच्या प्रत्येक इच्छुक उमेदवाराची मुलाखत बेळगाव live घेणार असून सातेरी यांच्या पासून या मुलखात सत्रास सुरुवात झाली आहे.
लहान पणा पासून राजकारण आणि कुस्ती सारख्या खेळाची जाण असलेल्या,साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिलेल्या संजय सातेरी यांनी यावर्षी दक्षिण मतदार संघातून उमेदवारी साठी समिती नेतृत्वाच्या भेटी गाठी घ्यायला सुरुवात केली आहे. मजगाव, मच्छ,पिरनवाडी,हुंचेनहट्टी, बाळकमट्टी, येळ्ळूर, धामणे आदी परिसर त्यांनी पिंजून काढला आहे.शहरातील दक्षिण भागात त्यांचे पै पाहुणे भरपूर आहेत मागील निवडणुकीत आमदार संभाजी पाटील यांच्या साठी त्यांनी भरपूर काम केलंय याचा आताही ते सक्रिय झालेत आणि उमेदवारीची ते मागणी देखील करणार आहेत.
समितीच्या जेष्ठ नेते मंडळींनी युवकांना निर्णय प्रक्रियेत सामावुन घ्यायला हवं दिल्लीत सुप्रीम कोर्टच्या केस फॉलो अप असुदेत किंवा बंगळुरू दरबारी मराठी कागदपत्रं शासकीय विकास कामे असुदेत यासाठी युवा चेहऱ्याना संधी द्यायला हवी असं ते म्हणतात. दक्षिण मतदार संघाच तिकीट मागताना जर एकीकरण समितीने नेतृत्वाने दुसऱ्या कुणास जरी संधी दिली तरी सक्षम पणे त्या उमेदवाराच्या पाठीशी राहू असेही ते म्हणाले.
समितीचे लढे झाले त्यात सक्रिय रित्या सहभाग घेऊन मराठी माणसांना एकत्रित करण्याचं काम गेली 15 वर्षांपासून मी करत आलोय याशिवाय मागील निवडणुकीत युवकां सोबत दक्षिण मतदार संघात बूथ टू बूथ यंत्रणा उभी केली या सह ग्राम पंचायत,तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत ए पी एम सी निवडणुकीत समितीच्या उमेदवारांना सर्व प्रकारे मदत केली आहे असा दावा देखील त्यांनी केलाय.
पुढील काळात देखील मराठी माणूस आणि सीमा प्रश्नात सक्रिय रित्या काम करू समिती नेते काय आदेश देतील त्यावर वाटचाल राहील सीमा प्रश्न सोडवणूक हाच मुख्य अजेंडा असेल अस देखील त्यांनी बेळगाव live शी बोलताना स्पष्ट केली.
संपर्क -संजय सातेरी
09880042636