नूतन महापौर कोण?
उद्या दि १ मार्च रोजी बेळगाव महानगरपालिकेत महापौर निवडणूक होणार आहे.बेळगावाचे महापौरपद अनुसूचीत जमातीसाठी तर उपमहापौरपद इतर मागास ‘अ’ प्रवर्गाच्या महिलेसाठी राखीव आहे. अनुसूचीत जमातीचे दोन्ही नगरसेवक विरोधी गटाकडे आहेत, त्यामुळे यावेळी महापौरपद बिगरमराठी नगरसेवकांना मिळणार हे नक्की आहे. यामुळेच महापौर कोण याकडे सगळ्यांचे लक्ष लागलर आहे.
बसाप्पा चिक्कलदिन्नी व सुचेता गंडगुद्री यांच्यात महापौरपदाचा सामना होणार आहे. उपमहापौरपदासाठी सत्ताधारी गटातील मिनाक्षी चिगरे व मधुश्री पुजारी यांच्यात चुरस आहे.मेघा हळदणकर या पंढरी परब गटाच्या आहेत. तर मधूश्री पुजारी या सत्ताधारी गटातील नाराज गटाच्या आहेत, यामुळे मेघा हळदणकर ऐवजी मधूश्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब व्हावे अशी मागणी दहाहून अधिक नाराज मराठी नगरसेवकांनी केली आहे. असे न झाल्यास आम्ही मधूश्री यांनाच मत टाकू असा इशारा देण्यात आलाय.
एक व्यक्ती एक पद या नात्याने मेघा हळदणकर यांनी यापूर्वी स्थायी समितीचे अध्यक्षपद भोगले आहे. यामुळे त्यांना बाजूला ठेऊन मधूश्री यांनाच उपमहापौर पद मिळावे यावरून वाद सुरू झाला आहे.आमचे मत मधूश्री पुजारीनाच अशी मागणी असली तरी सध्या सर्व ३१ नगरसेवक आंबोलीला रवाना झाले असून तिथे काय ठरते यावर सारेकाही उद्या गणित ठरणार आहे.
महापौर उपमहापौर निवडणुकीच्या आरक्षण विरोधात नगरसेवक रतन मासेकर यांच्या याचिकेचा तात्पुरत्या मनाईचा अंतरिम अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला मात्र मूळ खटला दाखल करून प्रलंबित ठेवण्यात आला यामुळे आगामी १ मार्च रोजी होणाऱ्या महापौर निवडणुकी समोर कायदेशीर अडथळा दूर झाला.
वकील रतन मासेकर यांनी पालिकेचे महापौर पदाचे आरक्षण कायदेशीर रित्या झाले नसल्याची याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात दाखल केली होती त्यानुसार सरकारी वकिलांना कोर्टाने स्पष्टीकरण देण्यास सुचवले होते मात्र सरकारी वकिलांनी या संदर्भात कोणतेच स्पष्टीकरण दिले नव्हते
त्यामुळे न्यायमूर्ती रवी मळळीमठ यांनी आरक्षणाला स्थगिती देण्याचा अंतरिम अर्ज फेटाळून लावला आणि मुख्य खटला तसाच पुढे ठेवण्यास अनुमती दिली.
आरक्षणा विरोधात असलेल्या याचिकेचा स्थगीतीअर्ज कोर्टाने फेटाळल्याने १ मार्च रोजी होणाऱ्या महापौर निवडणुकीची वाट मोकळी झाली.
यामुळेच महापौर व उपमहापौर निवडणूक उद्या १ मार्च रोजी होणार आहे. प्रादेशिक आयुक्त पी. ए. मेघण्णावर यांनी याबाबतचे निवडणूक वेळापत्रक जाहीर केले.
एक मार्च रोजी प्रादेशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दुपारी एक वाजता महापालिकेची विशेष बैठक होईल. या बैठकीत नूतन महापौर व उपमहापौरांची निवड होईल.