गेली एक वर्ष बेळगाव शहराच्या प्रथम नागरिक म्हणून मान मिळवलेल्या महापौर संज्योत बांदेकर यांचा बुधवारी दुपारी पालिकेत महापौर म्हणून शेवटचा दिवस होता त्यांनी कर्ण बधिर मुलांना मशीन वितरित करून आपल्या कारकिर्दीचा शेवट केला.
सकाळी पालितकेतील महापौर कक्षात झालेल्या कार्यक्रमात 3 % अनुदानातून मंजूर झालेल्या दोघांना कर्ण बधिर मशीनी वितरित केल्या.
महापौर पद स्वीकारल्या पासून एका वर्षात बेळगाव live ने महापौर संज्योत बांदेकर यांना बऱ्याचदा कव्हर केलं आहे. काळ्या दिनाचा सहभाग त्यांची खास इमेज उमटून पालिकेच्या इतिहासात शासनाचा विरोध असताना मूक सायकल फेरीत सहभागी झालेल्या महापौर म्हणून त्यांची नोंद होईल. चंदीगड दौरा सह इतर विकास आढावा बैठकातून त्या सामान्य होत्या.गणेश विसर्जन मिरवणूक शेवटच्या गणेश मूर्ती विसर्जन करताना त्यांनी घेतलेली भूमिका योग्य होती मात्र सीमा प्रश्नाचा ठराव न मांडल्याने इतर नगरसेवका बरोबर त्यांनाही टीकेला सामोरे जावे लागले.
केवळ एक नगरसेविका आणि मराठी विद्या निकेतन पूर्व प्राथमिक शाळेच्या शिक्षिका म्हणून मोजक्या लोकांना परिचयाच्या असलेल्या बांदेकर बेळगावकरांच्या परिचयाच्या बनल्या आहेत माजी महापौरांच्या यादीत त्यांचं देखील नाव समाविष्ट होणार आहे.