ऑटो नगर येथील कत्तल खान्यावर माळ मारुती पोलिसांनी घातलेल्या छाप्या नंतर सुद्धा कारवाई करण्यास विलंब करण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यां विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जाब विचारून निदर्शन केली.
सोमवारी बंगळुरू येथील एका एन जी ओ ने दिलेल्या तक्रारी नुसार कोल्ड स्टोरेज च्या नावाखाली इतर राज्यांना मांस पुरवण्याचा आरोप करण्यात आला आला होता या नुसार माळ मारुती पोलिसांनी कत्तल खान्यावर गुन्हा देखील नोंदवला होता मात्र पोलिसांकडून कारवाई साठी दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करण्यात येत होता.
त्यानुसार उत्तर भाजप कार्यकर्त्यांनी ऑटो नगर येथील कत्तल खान्या समोर निदर्शन केली आणि या प्रकरणी निःपक्षपाती पणे पोलिसांनी राजकीय दबावाखाली न येता चौकशी करावी अशी मागणी केली आहे. कत्तल खान्यात पोलिसांकडून मीडियाला प्रवेश देण्यात येत नव्हता मात्र भाजप कार्यकर्त्यांनी दबाव वाढवला होता.
2014 साली बेळगाव शहरात कसाई गल्ली कॅम्प येथे एकेक कत्तल खाने होते मात्र आता ऑटो नगर मध्ये 8 बेकायदेशीर कत्तल खाने दिवसा ढवळ्या सुरू आहेत मात्र प्रशासन पोलीस अधिकारी पालिकेचे अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून गप्पच आहेत असा आरोप भाजप नेते किरण जाधव यांनी केला आहे.यावेळी भाजप नेते अनिल बेनके, खासदार सुरेश अंगडी, शिवाजी सुंठकर अन्य भाजप कार्यकर्ते देखील उपस्थित होते.