पाणी अडवून जिरवण्यासाठी माळमारुती आणि श्रीनगर उद्यान या दोन ठिकाणी दोन टाक्या तयार केल्या जाणार आहेत.
या कामासाठी एकूण ८ लाख ५४ हजार ८० रुपये इतका खर्च येणार आहे.
स्मार्ट सिटी योजनेतून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शहरी भागात पावसाचे प्रमाण कमी होत चालल्याने हा प्रकल्प महत्वाचा असून पावसाचे अडवलेले पाणी पुन्हा वापर करता येईल.
पावसाचे पाणी जमिनीवर पडून वाहून जाण्यापेक्षा ते साठवून शुद्ध करायचे अशी ही योजना स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.