Friday, April 19, 2024

/

रेल्वेच्या धडकेत गवा रेड्याचा मृत्यू

 belgaum

रेल्वेची धडक बसल्याने अंदाजे ९ वर्षाच्या  गवा रेड्याचा  खानापूर तालुक्यात मृत्यू झाला आहे. केडेगाळी गावानजीक रेल्वे मार्गावर ही घटना घडली आहे.

bison- khanapur
पशुवैधकीय डॉक्टरांनी पोस्टमार्टम करून  खानापूर तालुक्यात गवा रेड्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

खानापूर अरण्य विभागात रेड्याची संख्या मोठी आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचाच मोठा धोका त्यांना आहे.अळणावर- लोंढा-कॅसलरोक आणि लोंढा ते मिरज रेल्वे लाईन त्यांच्यासाठी मृत्यूचा सापळा बनत आहे.
वनखात्याने या प्राण्यांच्या सुरक्षेसाठी काहीतरी उपाय करा अशी विनंती वारंवार सार्वजनिक बांधकाम खाते, रस्ते महामंडळ आणि रेल्वे विभागाकडे केली आहे. मात्र काहीच लक्ष दिले जात नाही.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.