नवहिन्द सोसायटीतर्फे रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेले जेष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत शिवाजी कोकाटे यांच्या व्याख्यानाला विरोध करून रद्द करण्यास शिव प्रतिष्ठान हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी भाग पाडले.
नवहिन्द सोसायटीतर्फे रौप्य महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचाच एक भाग म्हणून कोकाटे यांचे छत्रपती शिवाजी महाराज आणि कार्य या विषयावर मराठा मंदिर येथे सायंकाळी व्याख्यान आयोजित केले होते.
काही दिवसांपूर्वी आयोजकांची भेट घेऊन शिवाप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी कोकाटे यांचे व्याख्यान रद्द करा अशी मागणी केली होती.पण त्याकडे दुर्लक्ष करून नवहिन्दने व्याख्यानांचे आयोजन केले होते.आज सोमवारी व्याख्यानाच्या कार्यक्रमा अगोदरच शिव प्रतिष्ठानचे दोनशेहून अधिक कार्यकर्ते मराठा मंदिर येथे व्याख्यानाला विरोध करण्यास जमले होते.यावेळी जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी करून व्याख्यान रद्द करा अशी भूमिका घेतली.अखेर शिव प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा विरोध ध्यानात घेऊन कोकाटे यांचे व्याख्यान रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला.यावेळी वातावरण तणावपूर्ण बनले होते.पोलिसही बंदोबस्तासाठी दाखल झाले होते. कार्यक्रम संपे पर्यंत रात्री उशीर हिंदू संघटनानाचे कार्यकर्ते मराठा मंदिरा समोरच जमले होते.नियोजित व्याख्यान रद्द झाल्याने स्थानिक नेत्यांच्या सहभागाने कार्यक्रम आटोपता घेण्यात आला मात्र गर्दीही कमी झाली त्यामुळे या कार्यक्रमास गालबोट लागल्याचे चित्र दिसले.
शनिवारी रात्री येळ्ळूर येथे शाहीर शीतल साठे यांच्या पोवाडा कार्यक्रमावर देखील दगडफेक करण्यात आली होती त्यानंतर मराठा आज सोमवारी मराठा मंदिरात व्याख्याना वरून पुन्हा एकदा नाव हिंद ला विरोधाचा सामना करावा लागला आहे.
कार्यक्रमावेळी कोकाटे यांनी गणेश पूजन करा आम्ही निघून जाऊ असा तोडगा आम्ही दिला होता तो आयोजकांनी मान्य केला पण कोकाटे यांनी कार्यक्रमस्थळी आलेच नाहीत हिंदू देव देवता वर टीका करणाऱ्या शक्तींना बेळगावात थारा देऊ नये अस पत्रक शिव प्रतिष्ठान चे बेळगाव जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी काढले आहे.