किशन आणि प्रसाद थोरात या बेळगावच्या भावंडांनी तीन विमाने आणि २६ तासांचा प्रवास करून फिनिक्स गाठले. शरीराचा समतोल साधण्याची कला त्यांनी दाखवली पण व्हिसा च्या समस्येने त्यांना परत यावे लागले.
थोरात भावंडांनी आपल्या कलेची प्रात्यक्षिके दाखवली तीही अमेरिकाज गॉट टॅलेंट मध्ये. मागच्या वर्षी त्यांनी आपले कौशल्य इंडियाज गॉट टॅलेंट मध्येही दाखवले होते.
मल्लखांबावर स्वतःचे शरीर तोलून धरत इतरांचा श्वास रोखून धरण्याचे कसब या भावंडांनी कमावले आहे. व्यासपीठाच्या उंचीपेक्षा २० फूट वर हे आपले कसब दाखवतात.
भारतात आम्ही साऱ्यांच्या नजरा खिळवल्या पण आत्ता अमेरिकेत फिनिक्स कन्व्हेंशन सेंटर मध्ये कला दाखवण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्यच आहे, असे या भावंडांपैकी प्रसाद म्हणतो.